Khirdi

खिर्डी खु.येथील स्टेशन रोड मरिमाता मंदिर परिसरातील घटना खिर्डी च्या युवकावर विळ्याने वार, दोन जण गंभीर जखमी

खिर्डी खु.येथील स्टेशन रोड मरिमाता मंदिर परिसरातील घटना खिर्डी च्या युवकावर विळ्याने वार, दोन जण गंभीर जखमी

प्रवीण शेलोडे खिर्डी

खिर्डी : खिर्डी खु.येथील स्टेशन रोड मरिमाता मंदिर परिसरातील रहिवाशी धनराज भंगाळे यांच्या घराजवळ १२ऑक्टो रोजी रात्री८ वाजेच्या सुमारास दगड मारल्याने ते स्वतः व त्यांचे लहान भाऊ महेंद्र भंगाळे घराबाहेर येवून पाहिले असता सदर ठिकाणी आरोपी मुकेश रेवा बढे हा त्याठिकाणी हजर असल्याने त्यास घरावर दगड का मारतो असे विचारले असता या गोष्टीचा राग आल्याने त्याने आपल्या हातातील विळ्याने धनराज भंगाळे यांच्या मानेच्या पाठीमागील भागावर व पोटावर तसेच त्यांचे लहान भाऊ महेंद्र भंगाळे यांच्या दाढीला व पाठीवर विळ्याने वार करून गंभीर जख्मी केले असून त्यांना उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून या बाबत सौ.प्रतिभा धनराज भंगाळे यांनी फिर्याद दिल्याने निंभोरा पो.स्टे.ला भाग ५.गुरनं १४०/२०२१ भादंवि ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून निंभोरा पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याच्या कडील विळा हस्तगत करण्यात आला असून.
स.पोनि स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास स.फौ.अन्वर तडवी हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button