Khirdi

कांडवेल येथे कंपनीचा सभापती यांच्या हस्ते शुभारंभ..!

कांडवेल येथे कंपनीचा सभापती यांच्या हस्ते शुभारंभ..!

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : खिर्डी येथून जवळच दि.30 ऑगस्ट रोजी कांडवेल येथे महाशेट फॉमर्स प्रोड्यूसर कं.ली.चा शुभारंभ पं.स.सभापती सौ.कविता हरीलाल कोळी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
हरिलाल कोळी यांनी गावातील शेतकरी बांधवाना आपल्या मनोगतात मोलाचे मार्गदर्शन केले.शेतकरी उत्पादन करतात पण मार्केटिंग व त्याला चांगला भाव मिळत नाही त्यामुळे ही कंपनी उपयोगी आहे.त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळतो.म्हणून या कंपनी ची स्थापना करण्यात आली.जेणेकरून शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात फायदा व्हावा. यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या महाशेट फॉर्मंस प्रोड्युसर या कंपनी चा आज शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button