Kolhapur

श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन शाखेचे उद्धाटन.

श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन शाखेचे उद्धाटन.

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मरणार्थ दिनांक १७/०२/२०२१ रोजी श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज मध्ये गोपाळराव गोखले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व संस्थेच्या प्रशासन अधिकारी डाॅ.मंजिरीताई देसाई मोरे यांच्या प्रेरणेने झालेल्या सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन शाखेचा उद्घाटन सोहळा काॅलेजच्या प्रांगणात पार पडला. शिक्षण प्रसारित मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज कागल येथे सुशिलादेवी मल्हारराव देसाई स्मृतिदिन व सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन कोल्हापूर शाखा श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज येथे संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्राचार्य जे.डी.पाटील उपस्थित होते. शिक्षण महर्षी एम.आर.देसाई यांच्या पत्नी श्रीमती सुशिलादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.श्री एन एन गिरी यांनी केले.व्याख्याता प्रा.सौ. एस. एस. पाटील यांनी युवती सचेतना फौंडेशनच्या उदिष्टावर प्रकाश टाकून आईसाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली.तसेच प्राचार्य श्री जे.डी.पाटील यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य श्री जे.डी.पाटील उपमुख्याध्यापक श्री बाळ डेळेकर , उपप्राचार्य श्री बी.के.मडीवाळ पर्यवेक्षिका सौ.एस.ए.कुलकर्णी आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button