Chandwad

चांदवडला नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामांचे उदघाटन

चांदवडला नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामांचे उदघाटन

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : आज दिनांक 26/02/2019 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी चांदवड मर्चंट बँक कॉलनी येथे रस्त्याच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. श्री भूषण कासलीवाल यांनी आपल्या कार्यकाळात प्रथम नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत व विशेष रस्ता निधी उपलब्ध करून आणलेला होता. परंतु रस्त्याची कामे पाईपलाईनचे व त्याअंतर्गत असलेल्या नळ कनेक्शन चे कामे चालू असलेले काही कालावधीसाठी उशीर झाल्यामुळे सदर कामे आज रोजी उद्घाटन करून काम चालू करण्यात आले. तसेच शहरामध्ये अशा प्रकारे अनेक कामे चालू असून नवनवीन योजनांचा नागरिकांना लाभ होत आहे. यापुढेही असेच काम करावे व नवनविन योजनांचा लाभ मिळावा असा येथील मर्चंट बँक कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना श्री भूषण कासलीवाल यांच्याकडे व्यक्त केल्या. यावेळी भूषण कासलीवाल यांनी सदर रस्त्याची कामे ही उत्कृष्ट व चांगल्या प्रतीची करावी म्हणून संबंधित ठेकेदारास सूचना केल्या. यावेळी मर्चंट बँक कॉलनी नागरिक व मित्र परिवार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button