Nashik

जानोरी येथेरामेश्वर मिसळपाव भजी सेंटरचे अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद नाशिक यांच्या हस्ते उद्घाटन

जानोरी येथेरामेश्वर मिसळपाव भजी सेंटरचे अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद नाशिक यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक विभागीय प्रतिनिधी सुनिल घुमरे
रामेश्वर मिसळपाव भजी या हॉटेल चे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती सौ मनीषा ताई पवार यांच्या हस्ते संक्रांतीच्या मुहूर्तावर करण्यात आले यावेळी जानोरी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे जानोरी चे पोलीस पाटील सुरेश घुमरे माजी उपसरपंच शंकरराव वाघ माजी उपसरपंच गणेश तिडके माजी उपसरपंच विष्णुपंत काठे भारतीय जनता पक्षाचे योगेश तिडके गावातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी रामेश्वर मिसळपाव संचालक ज्ञानेश्वर डवणे दिनकर डवणे परिवाराच्या आधारस्तंभ श्रीमती लक्ष्मीबाई काशिनाथ डवणे यांनी सौ मनीषा ताई पवार यांचा यथोचित सन्मान केला तसेच कैलासवासी माजी पोलीस पाटील काशिनाथ दवणे यांच्या बरोबरचे सहकारी व लवणे कुटुंबावर प्रेम करणारे स्थानिक ग्रामस्थ नागरिक बाबू शेठ बागमार कडू वाघ मधुकर घुमरे डॉक्टर खराडे आत्माराम घुमरे आदींसह विविध मान्यवरांचा डवणे परिवाराच्यावतीनेसत्कार करण्यात आला यावेळी सौ पवार यांनी सांगितले की जानोरी परिसरातील व जानोरी येथील शेतकरी प्रकारचे नवनवीन प्रयोग करून चांगल्या प्रकारची उत्तम शेती करतात तसेच या भागातील फुले गुलाब शेवंती झेंडू पाहून खरोखर मन प्रसन्न होते त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची तसेच आमचे बंधू म्हणजेच ज्ञानेश्वर डवणे यांनी आज रामेश्वर मिसळ भजी पाव हॉटेल चे माझ्या हस्ते उद्घाटन केले असून ते उत्तरोत्तर प्रगती पथावर जाण्यासाठी माझ्या शुभेच्छा असून आपणही अशाच प्रकारचे प्रेम संबंधितांवर करावे व व्यवसाय वाढीस मदत करावी असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानोरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री शंकरराव वाघ यांनी केले त्यांनीही सौ मनीषा ताई पवार भविष्यकाळात जानोरी ला वेळ दिलेल्या बऱ्याच लोकप्रतिनिधींचे आगामी काळात उच्च पदावर पोचण्यासाठी येथील जनतेच्या भरभरून शुभेच्छा मिळतात याच प्रकारे सौ मनीषा ताई यांनाही भविष्य काळामध्ये आपण आमदार म्हणून आमच्या गावी पुन्हा याल अशा प्रकारच्या सदिच्छा सर्व ग्रामस्थांतर्फे ओळख कार्यक्रमाचे आयोजकांतर्फे ताईंना देण्यात आल्या तर अत्यंत आगळा-वेगळा उद्घाटन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचेआभार दत्तात्रयघुमरे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button