Pandharpur

पंढरपुरात पल्स कोविड हॉस्पिटल चे उद्घाटन,,

पंढरपुरात पल्स कोविड हॉस्पिटल चे उद्घाटन,,
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर ता.10 कोरोना रुग्णांवर वेळेत योग्य ते उपचार व्हावेत यासाठी
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे आणि माजी नगराध्यक्ष नागेश भोसले
यांनी पुढाकार घेवून पंढरपुरात 150 बेडचे स्वखर्चातून पल्स कोविड हाॅस्पिटल उभा केले
आहे. सोमवार (ता.10) रोजी उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदानी ,प्रांताधिकारी सचिन ढोले, डॉ संग्राम गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,सोमवार पासून येथील हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुुरु केले जाणार आहेत,अशी माहिती दिलीप धोत्रे,नागेश भोसले यांनी आज दिली.
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या
कोरोना रुग्णांना आॅक्सीजन आणि बेड वेळवर मिळत नसल्याने हाल सुरु आहेत.त्यामुळे येथील रुग्णांना सोलापूर, सांगली, मिरज,पुणे आदी ठिकाणी
उपचारासाठी जावे लागत आहे. स्थानिक लोकांना पंढरपुरातच वेळेवर योग्य ते
उपचार व्हावेत, लोकांची गैरसोय कमी व्हावी यासाठी सर्व सोयीनियुक्त 150
बेडचे हाॅस्पिटलची उभारणी केली आहे.भटुंबरे जवळ हे हाॅस्पिटल सुरु करण्यात आले आहे. यामध्ये आॅक्सीजनचे 50 बेड आणि आयसोलेशन चे 100 बेड तयार करण्यात आले आहेत.येथे येणाऱ्या रुग्णांवर तज्ञ वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जाणार आहेत.येथील हाॅस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. आज प्रांताधिकारी सचिन ढोले,
नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,तहसीलदार सुशील बेल्हेकर,तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले,डाॅ.संग्राम गायकवाड यांनी यांनी
रुग्णालयाला भेट देवून पाहाणी केली. यावेळी त्यांनी येथे देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.आठ दिवसामध्ये या हॉस्पिटल ची उभारणी कारण्यात आली आहे ,या ठिकाणी सर्व तज्ञ डॉक्टर रुग्णावर उपचार करनार आहेत, सर्व अनुभवी कर्मचारी यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे ,
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, आणि नागेश भोसले यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे,,,या वेळी सर्व मान्यवर उपस्थित होते,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button