Pune

बावडा येथे अंकिता पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टचे उद्घाटन

बावडा येथे अंकिता पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टचे उद्घाटन

दत्ता पारेकर पुणे

पुणे : बावडा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये इंडो- अमेरिकन फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून सुमारे 1 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पी.एस.ए.ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवीदिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी शनिवारी (दि.28) केले. बावडा परिसरातील रुग्णांसाठी भविष्यात अडचण येऊ नये म्हणून ऑक्सिजन निर्मितीचा प्लॉट असावा, यासाठी अंकिता पाटील यांनी इंडो- अमेरिकन फाऊंडेशन नवी दिल्ली यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅन्ट उभारण्यात आला.

सदर ऑक्सीजनचा प्लॅन्ट आज कार्यान्वित होत असल्यामुळे, यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाल्याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी व्यक्त केली. भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या कोरोना लाटेत गरजू रुग्णांना या ऑक्सीजन प्लॅन्टमुळे फायदा होणार आहे व एकाही रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होणार नाही. बावडा ग्रामीण रुग्णालयासाठी हा ऑक्सीजन प्लँन्ट दिलेबद्दल इंडिया-अमेरिकन फाउंडेशनचे अंकिता पाटील यांनी याप्रसंगी आभार व्यक्त केले.

यावेळी बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, ग्रा.पं.सदस्य दादा कांबळे, मुनीर आतार, डॉ.विनोदकुमार घोगरे, डॉ. हिना काझी, अनिल कांबळे, शशिकांत जाधव, सचिन सावंत, ग्रामविकासअधिकारी अंबिका पावशे आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button