Aurangabad

महिलांसाठी घाटीत 40 खाटांचा नवीन वॉर्ड, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन

महिलांसाठी घाटीत 40 खाटांचा नवीन वॉर्ड, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील जुन्या वॉर्ड क्रमांक चारचे नूतनीकरण करुन अद्यावत अशा प्रकारच्या 40 ऑक्सिजन असलेल्या खाटांचा स्वतंत्र नवीन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमधे महिला रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. शिवाय वॉर्डमध्ये सर्व खाटांना ऑक्सिजनची सुविधा देखील आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने घाटीत जुन्या मेडिसिन विभागाच्या इमारतीत नवीन वॉर्डची निर्मिती होऊन वैद्यकीय सेवेस सुरुवात झाली. या वॉर्डचे उद्घाटन जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते आज झाले.

यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मेडीसीन विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य व घाटीतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button