Amalner

?️अमळनेर कट्टा..Breaking…उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे वाळू माफिया जोरात..!पण पोलीस विभागाने दिला दणका..7 अवैध वाळूचे डंपर व एक जेसीबी ताब्यात..!आतापर्यंत ची सर्वात मोठी कार्यवाही..

?️अमळनेर कट्टा..उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे वाळू माफिया जोरात..!पण पोलीस विभागाने दिला दणका..7 अवैध वाळूचे डंपर व एक जेसीबी ताब्यात..!आतापर्यंत ची सर्वात मोठी कार्यवाही..
अमळनेर येथे जळोद नदी पात्रात १३ रोजी पहाटे साडेतीन वाजता तापी नदीतून अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सात डंपर व एक जेसीबीसह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. व चालक मालकासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यात चारही बाजूंनी नदी पात्र आहेत ह्या सर्व ठिकाणी बोरी,तापी पांझरा मधून दिवस रात्र अवैध वाळू उपसा होत असतो.नागरिक त्रस्त झाले असून शेकडो तक्रारी या संदर्भात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत. पण डोळ्यावर पट्टी बांधलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना फक्त लहान सहान ट्रॅकटर व पॅजो रिक्षा वालेच दिसतात व त्यांच्यावर थातूर मातूर जिल्हा प्रशासनाला दाखविण्यासाठी कार्यवाही केली जाते.अनेक मोठे वाळू माफिया राजरोसपणे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू वाहतूक करतात.हे सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसूनच वाळू च्या ऑर्डरी घेतात या संदर्भातील बातमी देखील ठोस प्रहारने प्रकाशित केली होती.
पण आता मात्र पोलीस प्रशासनाने अत्यन्त मोठी कार्यवाही करत दोन्ही अधिकाऱ्यांना चांगलाच आरसा दाखवून दिला आहे.ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे .अवैध वाळू वाहतूक जोरात होत असल्यामुळे चार वेळा लिलाव काढूनही अमळनेर तालुक्यातून एकही वाळू ठेका गेला नाही. यामुळे शासनाचा प्रचंड महसूल बुडाला आहे.याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परिसरात रात्रीची गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे, रवींद्र पाटील, भूषण बाविस्कर, अमोल पाटील, योगेश महाजन, सूर्यकांत साळुंखे या पथकास तापी नदीत अनेक डंपर वाळू वाहतुकीसाठी उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अचानक छापा टाकला असता तेथे सात डंपर व एक जेसीबी मशीन आढळून आले.
इतर डंपर व ट्रॅक्टर तसेच जेसीबी मशीन पळवून लावण्यात काही लोक यशस्वी झाले. पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे जेसीबी (एमएच१९/सीयु५७६५) हा चालक गोपाळ रवींद्र पाटील (नांद्री) व मालक अमोल रमेश पाटील (अमळगाव), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम४६८५), चालक व मालक विक्की सतीश ललवाणी, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९/झेड- १९७०) चालक व मालक दीपक शालीक पाटील (नांद्री), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम५९४९) चालक विनोद महादू निकम (शिरुडनाका) व मालक किशोर बापू पाटील (विवेकानंद नगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीजी७०३१) चालक दिनेश नागो पाटील (बुधगाव, ता. चोपडा) व मालक अरुण पुंडलिक पाटील (रवीनगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीए २९०), चालक संतोष हिरामण जावळे (वाघोदा) व मालक अरुण पुंडलिक पाटील, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (जीजे ०१ डीझेड७५०)वरील चालक दिलीप आत्माराम पाटील (वाघोदे) व मालक सुरेश देविदास वालडे, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच०४/डीडी२१३६) चालक पपू शांताराम शिंगाणे (भोईवाडा), मालक भूषण आत्माराम बडगुजर यांच्यावर अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळील ३६ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४५ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.यानुसार विलास बागुल यांनी फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आण्णा उर्फ अर्जुन वासुदेव कोळी (जळोद) याच्या मालकीचे एक जेसीबी, ४ ट्रॅक्टर व १ डंपर नदी पात्रातून पळून गेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.
निविदा काढूनही ठेका नाही…!
शासनाने चार वेळा निविदा काढूनही ठेका गेला नाही. कारण अमळनेर तालुक्यात बोरी ,तापी,पांझरा नदीतून डंपर ,ट्रॅक्टर व टेम्पो मधून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी होत आहे. महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफिया जोरात आहेत. त्यामुळे चारवेळा निविदा काढूनही कोणीही ठेका घेण्यास तयार झाले नाही. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडून पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ यांचे अक्षम्य दुर्लक्ष याला कारणीभूत आहे.की दुसरे काही कारण आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण एका महिन्यापूर्वी एका मोठ्या वाळू माफियाचे डंपर व जेसीबी पकडले पण जागेवरच तोडी झाल्याची घटना घडली होती.!यावरून मोठे मासे सुरक्षित आहेत त्याला अर्थकारण जबाबदार आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दबक्या आवाजात विविध प्रकारच्या चर्चां ना उधाण आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button