Khirdi

खिर्डी खुर्द येथे कोविड लसीकरण कक्षाचे ग्रा.प. उपसरपंच पुष्पा पाटील हस्ते उदघाटन

खिर्डी खुर्द येथे कोविड लसीकरण कक्षाचे ग्रा.प. उपसरपंच पुष्पा पाटील हस्ते उदघाटन

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : देशासह आपले महाराष्ट्र राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले असून या आजाराचे संक्रमण आपले गावात गावपरिसरात वाढू नये या करिता कोविड लसीकरण करणे गरजेचे असल्याने व आपले गावात लसीकरणासाठी कोविड लस उपलब्ध व्हावी याकरिता तत्पर फाउंडेशन सामाजिक संस्थेचे वतीने तसेच खिर्डी खुर्द ग्रामपंचायत सरपंच राहुल फालक,उपसरपंच पुष्पाताई पाटील यांनी वारंवार मागणी केल्याने याची दखल घेऊन खिर्डी खुर्द चे आरोग्य सेवक डॉ चंदन पाटील यांनी ती मागणी वरिष्ठ कार्यालया कडून मंजूर करून घेतल्याने खिर्डी खुर्द येथे पहिला टप्पा म्हणून 70 लस उपलब्ध झाल्या असल्याने त्या लसीकरण कशाचे उदघाटन ग्रामपंचायत उपसरपंच पुष्पाताई पाटील यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत चे वतीने खिर्डी खुर्द ग्रामपंचायत सरपंच राहुल फालक, ग्रामपंचायत सदस्य सतीशभाऊ फेगडे, पवनभाऊ चौधरी, राहुलभाऊ बढे, सदस्या जयश्री कोचुरे,पोलीस पाटील प्रदीप पाटील तर तत्पर फाउंडेशन खिर्डी या सामाजिक संस्थेच्या वतीने तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील, सदस्य प्रदीप महाराज पंजाबी , रितेश चौधरी, सतीश फेगडे, शेख इद्रिसभाई,तसेच आरोग्य विभागाचे वतीने निंभोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ चंदन पाटील, आरोग्य सेवक चंदन सोमा पाटील, आरोग्य सेविका आर. एम. खाचणे, मदतनीस पल्लवी पाटील, आशा स्वयंसेविका सरला चौधरी, डाटा एंट्री ऑफरेटर दिपाली कोलंबे, उल्हास लढे सर, ग्रामपंचायत लिपिक योगेश कोळंबे, डाटा एंट्री ऑफरेटर विपीन झांबरे, आदींसह उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button