Paranda

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन..

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे दि. १७

भारतीय जनता पार्टी चे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन वाशी नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष सुरेश बप्पा कवडे व परंडा नगर पालिकेचे गटनेते सुबोधसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
करमाळा रोडवर ठाकुर मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, परंडा तालुका व युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते संकेतसिंह भैय्या ठाकूर, जिल्हा सं. चिटणीस विकास कुलकर्णी, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, विधी प्रकोष्ठचे ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, आदम शेख, जिल्हा चिटणीस ॲड. गणेश खरसडे, उद्योग आघाडीचे हनुमंत पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ॲड. तानाजी वाघमारे, युवा मोर्चा ता.अध्यक्ष अनिल पाटील, निशिकांत क्षिरसागर, नगरसेवक विठोबा मदने, मुस्साभाई हन्नूरे, रामकृष्ण घोडके, सरपंच शरद कोळी, दत्ता ठाकरे, शिवाजी पाटील, ॲड. संदीप शेळके, सिद्धीक हन्नूरे, अमोल गोफणे, डॉ. आनंद मोरे, डॉ. सचिन मोरे, आदर्श ठाकूर, आकाश मदने, अमर जमदाडे, धनाजी गायकवाड तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश विधाते, अमर ठाकूर, राजवीर माळी, सुरज मुसळे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button