Chandwad

चांदवड येथे घरगुती नॅचरल गॅस जोडणीचा शुभारंभ,लवकरच प्रत्येक घरात जोडणी होईल – भूषण कासलीवाल

चांदवड येथे घरगुती नॅचरल गॅस जोडणीचा शुभारंभ,लवकरच प्रत्येक घरात जोडणी होईल – भूषण कासलीवाल

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यामार्फत ग्रामीण भागात पहिल्यांदाच घरगुती नॅचरल गॅस जोडणीचा उपक्रम देशभरात सुरू झाला आहे. याद्वारे महाराष्ट्रात ६० ठिकाणी ही राबवल्या जाणार आहे. ग्रामीण भागात याची सुरुवात चांदवड पासून होत आहे. त्याचा शुभारंभ दिनांक ०६/०३/२०२१ रोजी हॉटेल भैरवनाथ शेजारी,चांदवड व नेमिनाथ जैन इंजिनिअरिंग येथे पार पडला.चांदवड शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये घरगुती नॅचरल गॅस जोडणीच्या उपक्रमाने यात आणखी भर पडणार आहे. याचा फायदा नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला जास्त होईल. दर महिन्याला गॅस भरणे, त्याची सुरक्षितता, त्याची किंमत आणि महत्वाचे म्हणजे गॅस घेण्याअगोदर पैसे मोजावे लागतात. या योजनेमुळे जितका गॅस वापरल्या जाईल तितकेच पैसे द्यावे लागतील. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ही याचा फायदा होईल.
नाशिक शहरात नॅचरल गॅस लिमिटेड यांच्यामार्फत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. या अंतर्गत नाशिक ते धुळे शहरापर्यंत पाईपलाईन द्वारे नॅचरल गॅस ची वहन प्रक्रिया सुरू होणार आहे. हे समजताच आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शहरात यावे अशी चर्चा श्री.भूषण कासलीवाल यांनी नागरिकांशी केली. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन खासदार मा.डॉ.सौ.भारतीताई पवार आणि आमदार मा.डॉ.श्री.राहुलदादा आहेर यांच्या सहकार्याने यासाठी प्रयत्न केले गेले.चांदवड येथे 2015 ला नगरपरिषद सुरू झाली, येथील नागरिक प्रगतशील विचारांचे असल्यामुळे निमशहर ते शहर हा प्रवास जलदगतीने होत आहे. ग्रामीण भागातील याची सुरुवात चांदवडपासून होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. या प्रकल्पाचे नागरिकांनी स्वागत केले.
या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून खासदार मा.डॉ.सौ.भारतीताई पवार, अध्यक्ष मा.डॉ.श्री.राहुलदादा आहेर तसेच विशेष उपस्थित म्हणून MGNLचे एम.डी. श्री.एस.हल्दर, MGNLचे डी.सी. श्री.एस.शर्मा, MGNLचे इंडिपेंडन डायरेक्ट श्री.राजेश पांडे, MGNLचे इंडिपेंडन डायरेक्ट श्री.दिपक मुकादम, MGNLचे नॉमिनी डायरेक्टर श्री.अमित गर्ग, चांदवड नगर परिषदचे प्रथम नगराध्यक्ष श्री.भूषण जयचंद कासलीवाल उपस्थित होते.
श्री. भूषण कासलीवाल यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास जि.प. सदस्य मा.डॉ.श्री.आत्माराम कुंभार्डे, सभापती तथा पं.स. सदस्य मा.सौ.पुष्पाताई धाकराव, नगराध्यक्ष श्री.भूषण कासलिवाल, पं.स.मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, भाजपा तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे तसेच भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व चांदवड शहरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. जि.प.सदस्य सौ.ज्योतीताई आहेर आदींचे सहकार्य लाभले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button