Chandwad

महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या घरगुती जोडणी कामाचा गुरुकुल कॉलनीत शुभारंभ

महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या घरगुती जोडणी कामाचा गुरुकुल कॉलनीत शुभारंभ

उदय वायकोळे चांदवड

चांदवड शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस आता प्रत्येक घरात स्वस्त दरात जोडणी करून गॅस उपलब्ध करून देणार आहे.गुरुकुल कॉलनी व महालक्ष्मी नगर परिसरात या गॅस च्या घरगुती लाईनच्या कामाचा शुभारंभ आज दि 24 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आला.यावेळी जेष्ठ नागरिक श्री अशोक वायकोळे गुजराथी बिल्डकाँन चे श्री निलेशशेठ गुजराथी,रितेश गुजराथी यांच्या हस्ते नारळ फोडून पूजा करण्यात आली व कामाला सुरुवात करण्यात आली.यावेळी कामासाठी लागणाऱ्या सर्व शस्त्रांचे पूजनही करण्यात आले.याप्रसंगी अभियंता श्री पराग कासलीवाल,अभियंता प्रशांत गडाख यांचेसह कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button