Kolhapur

आधूनिक मावळ्यानी केली मोहीम फत्ते समाजासमोर ठेवला नवा आदर्श

आधूनिक मावळ्यानी केली मोहीम फत्ते समाजासमोर ठेवला नवा आदर्श

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : किर्र जंगलात रांगणा गडाच्या खोल दरीत सुमारे ९०० फुटावर गेली अनेक वर्षे अंदाजे ५०० ते ६०० किलो वजनाची असणारी तोफ आधुनिक युगातील नव्या मावळ्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने सुरक्षितपणे गडावर चढवली.
इसवीसन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील दोन तोफा दरीत ढकलल्या होत्या.यापैकी एक तोफ गडावर आणण्याचा निर्धार कोल्हापुर जिल्ह्यातील मावळा प्रतिष्ठानने केला होता.यासाठी वेळोवेळी गडाला भेट देऊन व दरीच्या जागेची पाहणी करून मोहिमेचे योजनाबद्ध ड्रॉईंग,नकाशे,विविध परवानग्या घेऊन नियोजन करण्यात आले.यामध्ये ६० मावळ्यांनी आपला सहभाग नोंदवला. याकामी कांताभाई पटेल,महादेव फराकटे(बिद्री) प्रा .,एच.आर.पाटील(कोनवडे), शशिकांत पाटील( तिरवडे) व खानापूर,, कोनवडे , कोगनोळी ,बिद्री,बोरवडे, बाणगे
मुरगुड , पट्टणकोडोली,येथील शिवभक्तांची मोलाची साथ लाभली.
मोहिमेत ऋषिकेश जाधव,राहुल गणमाळे, तुषार पाटील,सचिन गिरगावे,अवधूत पाटील,संदीप देसाई,संजय गावडे,रवी गनमाळे, सुखदेव पाटील, विजय म्हाळुंगेकर ,निलेश मगदूम संदिप पाटील अवधूत पाटील विक्रम तावडे यांच्यासह अनेकांनी योगदान दिले.
चौकट
मोहिमेचे नियोजन
२४ ते २६ जानेवारीला तोफ जंगलातून ४५० फूट वर आणण्यात आली.
६ ते ८ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्यात तोफ आणखी ४०० फूट वर अवघड मार्गातूम वर चढवण्यात आली.
आणि उर्वरित १५० ते २०० फूट बिकट व दुर्गम मार्गावरून सोमवारी (दि.१५) वर काढण्यात आली.
चौकट
पाटगाव धरणाचे कनिष्ठ अभियंता कै. बी.जी.चव्हाण यांनी दरीतील या तोफा ४० वर्षांपूर्वी शोधून काढल्या होत्या.यानंतर निसर्गवेध परिवार आणि दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांचा वारसा जपत रांगणा किल्याचे पावित्र जपण्यासाठी मावळा प्रतिष्ठान गेली ६ वर्ष वेगवेगळ्या मोहिमांचे आयोजन करत आहे.
सुमारे ९०० फुटावर पडलेली अंदाजे ५०० ते ६०० किलो वजनाची तोफ मावळा प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी रांगणा गडावर सुरक्षित पोहचवण्याची मोहीम फत्ते केली.मोहीम फत्ते झाल्यानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button