Yewala

येवल्यात चौफुली वर उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने येणाऱ्या ईरटीका गाडीने जोरदार धडक

येवल्यात चौफुली वर उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने येणाऱ्या ईरटीका गाडीने जोरदार धडक

शांताराम दुनबळे येवला

येवला : येवल्यात विंचूर चौफुली येथे उभा असलेला टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ईरटीका गाङीने जोरदार धडक दिली त्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की दि.13 तारखेला रात्री 9 वा औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील चिंचखेड येथील काही प्रवाशी नाशिक येथे राम कुंडावर्ती अस्थी विसर्जीत करण्यासाठी गेले असता परतीच्या प्रवासात ते येवला येथे विंचुर चौफुली वर चहा पाणी घेण्यासाठी थांबले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ईरटीका गाडीने जोरदार धडक दिली त्यात दोन जण गंभीर जखमी झालेल्या असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन एकेरी मार्गाने वाहतूक चालू झाली होती पोलिसांनी वेळेतच विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली ही सर्व घटना सी सी टीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button