kalamb

कळंब:-भाजप तालुकाध्यक्षपदी अजित पिंगळे यांची निवड

कळंब:-भाजप तालुकाध्यक्षपदी अजित पिंगळे यांची निवड

प्रतिनिधी:;सलमान मुल्ला

कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील रहिवासी असलेले मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व आत्ताचे भाजप नेते अजित पिंगळे यांची भाजपच्या कळंब तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी ही निवड केली आहे.

अजित पिंगळे हे बालपणापासून शिवसेनेमध्ये होते त्यांनी शिवसेनेत असताना त्यांनी पाथर्डीचे सरपंच, शिवसेना तालुकाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब चे संचालक व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशी विविध जबाबदारीची पदे सांभाळली आहेत.

अशा प्रशासकीय पदांची यशस्वी कारकीर्द असलेल्या अजित पिंगळे यांची पक्षाचेे एक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा म्हणून ओळख आहे.

मितभाषी व उत्कृष्ट वक्ते असणारे अजित पिंगळे हे उत्तम संघटक असून त्यांच्या नियुक्तीने कळंब तालुक्यात भाजप पुन्हा नव्याने उभारी घेईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यांच्या निवडीनंतर उस्मानाबाद येथील भाजप जिल्हा कार्यालयात पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता भाऊ कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख दिलीप पाटील, भाजपा अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष सतपाल बनसोडे,माणिकराव बोंदर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कळंब तालुका अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर त्यांनी सर्वप्रथम कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून दर्शन घेतले व सर्व कार्यकर्त्यांचे देखील आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले

उस्मानाबाद जिल्हात व कळंब तालुक्यात भाजपला पुन्हा एक नंबरचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला सुध्दा न्याय देऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी यावेळी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button