Walchandnagar

वटपौर्णिमा सुवासिनींनी लुटला आनंद वालचंदनगर मध्ये

वटपौर्णिमा सुवासिनींनी लुटला आनंद वालचंदनगर

अमोल राजपूत

वालचंदनगर: दि: -५|६|२०२० ( इंदापूर तालुका ) वालचंदनगर येथील शहर आणि परिसरात शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. शहराच्या विविध भागात असलेल्या वडाच्या झाडाचेपूजन करण्यासाठी महिलांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत,शहर आणि परिसरात वडाच्या झाडाची पूजा केली .यंदा पावसाळा चांगला सुरू
झाल्यामुळे झाडांचे सौंदर्य वाढले आहे. शुक्रवारी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त वडाचे पूजन करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली नाही . वडाला हळद-कंकू,विड्याची पान , सुपारी, आंबे व गव्हा- तांदळाची ओटी,दक्षिणा ठेवून महिलांनी पुजा केली. प्राचीन काळी अश्वपती राजाची कन्या सावित्रीने आपल्या आजारी पतीचे प्राण वडाच्या झाडाखाली तपश्चर्या व निसर्गोपचार करून वाचविले.यमाच्या (मृत्यूच्या)तावडीतून पतीचे प्राण परत आणले. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेदिवशी घडली. म्हणून या पौर्णिमेस वटपौर्णिमा म्हटले जाऊ लागले.
भारतीय संस्कृतीत सावित्रीचा आदेश मानल्यामुळेच आदर्श कुटुंबव्यवस्था टिकून आहे ,म्हणून वटपौर्णिमेसारखे सण साजरे करणारे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले उत्साहात अन् चैतन्य वटपौर्णिमेच्या सणाचा एक वेगळाच आनंद, उत्साह अन् चैतन्य सुवासिनींमध्ये शुक्रवारी दिसून आले. सकाळपासून घरोघरी याची तयारी सुरू केली. नटून -थटून नवी कोरी साडी परिधान करून महिलांनी एकत्रित आले . वडाचे झाडाचे पारंपरिक पद्धतीने पूजन केले. यानिमित्ता हळदी -कुंकूचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. आनंदमयी वातावरणात महिलांमध्ये गप्पाही रंगल्या.
छाया :अमोल रजपूत
फोटो:
वालचंदनगर : वटपौर्णिमा निमित्त वालचंदनगर मेन कालॅनी , शहरात महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button