आटपाडी

झोपडीतील कन्येच्या गळ्यात ‘राजे’ घालणार सभापतीपदाची माला???

झोपडीतील कन्येच्या गळ्यात ‘राजे’ घालणार सभापतीपदाची माला???

पडळकर यांच्या आटपाडीतील अस्तित्वाचा आज होणार फैसला???

आटपाडी प्रतिनिधी:बापूसाहेब नामदास

आटपाडी पंचायत समितीच्या सभापतीची निवड सोमवारी दि. 30 रोजी होणार असून या पदासाठी सत्ताधारी भाजपमधून माजी आमदार राजेंद्र यांना देशमुख गट व भाजपा नेते गोपीचंद पडळकर गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.यामध्ये निंबवडे गणाच्या सदस्य सौ.पुष्पाताई सरगर व घरनिकी गणाच्या सदस्य सौ. भूमिका बेरगळ यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. तसेच दिघंची गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. उषा कुटे यांनीसुद्धा सभापतीपदावर दावा केला आहे.पण ही सभापती पदाची माळ भाजपाचे तालुक्यातील ‘राजे’ लोक झोपडीतील कन्या सौ. पुष्पाताई सरगर यांच्या गळ्यात घालण्याची दाट शक्यता आहे. या योगाने पडळकर यांच्या तालुक्यातील पंचायत समितीतील राजसत्तेच्या अस्तित्वाचा फैसला होणार आहे. तसेच भविष्यातील राजकारणाची रूपरेषा ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गोपीचंद पडळकर सध्या जिल्ह्यात व तालुक्यात सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावली असल्याने आटपाडी तालुक्यातील गोपीचंद पडळकर यांचे विश्वासू कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय असणारे जयवंतराव सरगर यांच्या पत्नी सौ.पुष्पाताई सरगर यांची सभापतीपदी निवड निश्चित मानली जात असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
सौ. पुष्पाताई सरगर यांनी उपसभापती म्हणून काम करत असताना गरिबी जवळून अनुभवल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य गरीब जनतेला अनेक योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.यामुळेच त्यांची लोकप्रियता तालुक्यातील वाढत आहे. सौ. पुष्पाताई सरगर यांना सभापतीपद मिळावे, अशी पडळकर गटाचे सर्व दिलदार व प्रामाणिक कार्यकर्ते यांचीसुद्धा निर्मळ इच्छा आहे. सरगर यांना सभापतिपद मिळावे अशी लोकभावना निर्माण झाली आहे.
सौ. पुष्पाताई सरगर यांना सभापतीपदाची संधी मिळाल्यास गोपीचंद पडळकर गटाची आटपाडी तालुक्यातील ताकद निश्चित वाढणार आहे. त्याचबरोबर आटपाडी तालुक्यातील राजकिय वजन निश्चित वाढेल आणि एक प्रामाणिक सर्वसामान्य गरीब घरातील सच्चा व स्वच्छ प्रतिमा असलेल्या पुष्पाताई सरगर यांना काम करण्याची मोठी संधी मिळणार हे नक्की. पण यामध्ये देशमुख गटसुद्धा सभापतीपद सौ. भूमिका बेरगळ यांना मिळावे, म्हणून आग्रही राहणार असल्याने नेमकी संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता आटपाडीकरांना लागून राहिली आहे.तसेच आणखी या संधीचा लाभ अन्य कोणाला मिळणार? या चर्चाना आटपाडी तालुक्यात उधाण आले आहे.

*सभापती पदाची नेमकी संधी कोणाला मिळणार हे गुलदस्त्यात ???*
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिलांमधून ही निवड होणार आहे. सत्ताधारी भाजप गटातील विद्यमान उपसभापती सौ. पुष्पाताई सरगर व भूमिका बेरगळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. उषाताई कुटे या सदस्य आरक्षित पदावरील दावेदार असून यामधून पंचायत समितीच्या नवीन कारभारीन कोण होणार हा फैसला सोमवारी होणार आहे.अद्याप हा निर्णय मात्र गुलदस्त्यातच नेत्यांच्या आहे.

*सौ पुष्पाताई सरगर यांची सभापती म्हणून निवड झाल्यास पडळकर यांची ताकद वाढणार*…
पहिल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये खुल्या प्रवर्गासाठी सभापतीपद असल्यामुळे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे चिरंजीव हर्षवर्धन देशमुख यांना सभापतीपदाची संधी मिळाली. यानंतर पुढील कालावधीसाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सभापतीपद आरक्षित झाले. विद्यमान उपसभापती पुष्पाताई सरगर व भूमिका बेरगळ या सत्ताधारी भाजप गटाच्या तर उषाताई कुटे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातील एकमेव सदस्य आहेत. सारिका भिसे याही काँग्रेसच्या एकमेव सदस्य आहेत.
आता भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांच्या गटाला संधी मिळणार असल्याचे निश्‍चित मानले जाते. त्यामुळे सभापतिपदी सौ. पुष्पाताई सरगर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच भाजपा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले युवा नेते जयवंतराव सरगर यांनी तालुकाभर विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर पंचायत समितीमधील उपसभापतीपदाचा सौ. सरगर यांना अनुभव आहे. त्यामुळे अनुभव, तालुक्यातील कार्य आणि जनसंपर्क याच्या जोरावर त्यांना सभापतीपद मिळाल्यास भाजपला तालुकाभर आपली ताकद वाढवण्यासाठी पुन्हा चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button