Maharashtra

लोणंद मध्ये “रक्षक क्लिनिक” ची निर्मिती लोणंद मेडिकल व इंडियन मेडिकल असोसिएशनचा पुढाकार

लोणंद प्रतिनिधी

सर्वत्र कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यासाठी कृतिशील पाऊले पडत आहेत. लोणंद ता.खंडाळा येथे आरोग्य विषयक काळजी म्हणून आलेल्या रूगांना तपासणी करण्याचे काम करण्यासाठी रक्षक क्लिनिक या प्रोजेक्ट ची निर्मित करण्यात आलेली आहे.मा.जिल्हाधिकारी सातारा, वाई प्रांत व तहसीलदार खंडाळा यांच्या सुचनेनुसार लोणंद ता.खंडाळा येथे लोणंद मेडिकल असोसिएशन, लोणंद व लोणंद-निरा IMA असोसिएशन यांनी पुढाकार घेत “COVID 19 OPD अर्थात रक्षक क्लिनिक” ची औपचारिक सुरुवात रविवार दि. 29 मार्च रोजी केली आहे.

आपण लढू आणि आपण जिंकूही, आपल्या एकतेने
आपण सुरक्षित राहुयात असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .तसेच हे
रक्षक क्लिनिक जिह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आदर्शवत होईल असा विश्वास वाटत आहे.”रक्षक क्लिनिक” हा प्रोजेक्ट सिद्धिविनायक हाॅस्पिटल कॅम्पस (तळमजला)
लोणंद याठिकाणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. यांमध्ये सर्दी, खोकला, घसा
दुखणे, ताप व धाप असणारे रोगी आदींवर असोसिएशनचे सर्व डॉक्टर उपचार करणार आहेत. यासाठी मा.प्रांताधिकारी संगिता चौगुले राजापुरकर, तहसीलदार दशरथ काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश पाटील, सपो निरीक्षक संतोष चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत बागडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.नितीन सावंत, लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलिंद काकडे तसेच डॉ.नानासाहेब हाडंबर, डॉ.किशोर बुटीयानी, डॉ.प्रतापराव गोवेकर, डॉ.राहुल क्षीरसागर,डॉ.अवधूत किकले व सर्व कार्यकारणी आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

सोबत फोटो जोडला आहे.

“रक्षक क्लिनिक” च्या माध्यमातून सेवा देणारे वैद्यकिय पथक.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button