Faijpur

ज्या घरात नारीचा सन्मान तेथे लक्ष्मी सरस्वतीचा वास – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

ज्या घरात नारीचा सन्मान तेथे लक्ष्मी सरस्वतीचा वास – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

सलिम पिंजारि फैजपूर: प्रतिनिधी ता यावल

जेथे नारीचा सन्मान आदर होतो तेथे देवाची उपस्थिती असते. तेथे लक्ष्मी सरस्वतीचा वास असतो असे परम पूज्य महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. नवरात्र उत्सव दरम्यान नवमीच्या दिवशी तब्बल ९० लहान कन्यांचा सन्मान सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वढोदा येथील निष्कलंक धाम मधील तुलसी भवनमध्ये करण्यात आला. महाराजांनी बाल कन्यांचे पाय धुऊन- पुसून त्यांना भेटवस्तू ( ऋतू पालकत्वाचे पुस्तक, हात रुमाल, मेहंदी कोन, कानातील टॉप्स, बिंदी, चॉकलेट मोत्याची माळ, गजरा, जेल पेन, शबनम, मास्क, यथाशक्ति दक्षिणा) देऊन पोटभर जेवण घातले. प्रत्यक्ष जगदंबेचे स्वरूप समजून त्यांचे हळद कुंकवाने पूजन केले. यावेळी त्या बालिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. मागील चार वर्षांपासून सतत हा उपक्रम ट्रस्ट तर्फे राबविला जात आहे. देशात सध्या महिलांवरील अन्याय अत्याचार सातत्याने वाढत आहे. नुकतेच रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील बाल हत्याकांड, हाथरस येथील प्रकरण हे मनुष्य जिवनाला काळीमा फासणारे आहे. अशा घटना घडू नये यासाठी कन्या पूजनाद्वारे मुलींबद्दल बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आपण बदलवू शकतो अशा कार्यक्रमाने त्याला आळा घालता येतो व घटना थांबवू शकतो. यावेळी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी संजीव महाजन मिलिंद भिरुड, चतुर महाजन, हिरामण शेठ भिरुड, विलास चौधरी, बल्लू सेठ गॅरेज वाले भुसावळ यांचेसह मुखी परिवार व भक्तगण उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button