Yawal

अनुष्का सोनवणेचा तिन वर्षानपासून वाढदिवसाच्या दिवशी वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम….

अनुष्का सोनवणेचा तिन वर्षानपासून वाढदिवसाच्या दिवशी वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम….

शब्बीर खान यावल

यावल : माध्यमीक विद्यालय किनगाव शाळेचे उपशिक्षक संजय सोनवणे व मनुदेवी माध्यमिक विद्यालय आडगाव कासारखेडा शाळेच्या उपशिक्षिका मृणाल सोनवणे यांची कनिष्ठ कन्या अनुष्का संजय सोनवणे ही मागील तीन वर्षांपासून घराजवळ झाड लावून वाढदिवस साजरा करत आहे तसेच यावर्षी सुध्धा तिने झाड लावून वाढदिवस साजरा केला आहे अनुष्का ही शिरसाड ग्रामपंचायत सदस्य व यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील यांची बहीण आहे अनुष्काचा यापुढे देखील वाढदिवस अशाच प्रकारे साजरा करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा मानस आहे. तिच्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे अनुष्का ही किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलची इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनी आहे सध्या ऑक्सीजनची कमतरता जाणवू लागली आहे त्यात निसर्गनिर्मित ऑक्सीजन फक्त झाडांमुळे मिळत असतो म्हणून अनुष्काने वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक संदेश देण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे झाडे लावून सोडून न देता लावलेल्या झाडांचे संगोपन व जतन करण्याचे काम मागील तीन वर्षांपासून अनुष्का स्वतः करत आहे अनुष्का सोनवणेच्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षलागवडीच्या या उपक्रमाचे इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरम विजयकुमार देवचंद पाटील सचिव मनिष विजयकुमार पाटील प्राचार्य अशोक पाटील व क्रिडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले यांनी कौतुक करत अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button