Rawer

जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ऐनपुरच्या स व पटेल विद्यालयास उपविजेतेपद.

जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ऐनपुरच्या स व पटेल विद्यालयास उपविजेतेपद.

निंभोरा- संदिप कोळी
जळगाव येथील नेहरू युवा सेंटर व नेचर हार्ट फाऊंडेशन यांच्या वतीने झालेल्या महाविद्यालयीन मुलींच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ऐनपुर ता रावेर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद पटकाविले.जळगावातील मु जे महाविद्यालयात ०९जानेवारी रोजी झालेल्या या स्पर्धेत चोपडा येथील विद्यार्थनींनी विजेतेपद पटकविले तर उपविजेतेपद ऐनपूरला मिळाले.
स व पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनीच्या कबड्डी टीम मध्ये कर्णधार म्हणून कल्याणी दोडके,उपकर्णधार म्हणून तेजस्विनी चौधरी,संजीवनी पाटील,प्रेरणा ब-हाटे,निकिता बखाल,खुशबू महाले,नेहा महाजन,पल्लवी महाजन, जयश्री इंगळे,आकांक्षा कोचुरे यांचा समावेश होता.तर त्यांना सहाय्यक म्हणून शिवदास कोचुर यांनी काम पाहिले.सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे संचालक मंडळ,शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी कडून कौतुक व अभिनंदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button