पंढरपूर

संविधान जागर ने पंढरीत जनजागृती प्रबोधन उत्साहात संपन्न ….

संविधान जागर ने पंढरीत जनजागृती प्रबोधन उत्साहात संपन्न ….

राहुल खरात
पंढरपुर- संविधान जागर कार्यक्रमा अंतर्गत विविध विषयावर समाज प्रबोधन करून पंढरीत जनजागृतीचे काम पुढील वक्त्यांनी त्यांना दिलेल्या विषयावर मौलिक मार्गदर्शन करून भाषणे व चर्चा केल्याने संविधान जागर कार्यक्रम ,पाक्षिक धम्मप्रकाश व मित्र परिवारा च्या वतीने रविवार दि.29.12.2019 रोजी सकाळी 10 ते सायं.6 या वेळेत प्राथमिक शिक्षक सभागृह,, पंढरपुर येथे उत्साहात संपन्न झाले .कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांचे शुभहस्ते थोरसमजसुधारक महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रिमाई फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळयास पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान आणि महात्मा फुले समग्र वाड्मय यांचे पुजन केले तर मा. रतन माळी यानी भारतीय संविधान उद्देशिका सर्वाना कडून म्हणून घेतली तर रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले रचित अखंडाचे गायन केले.त्यानंतर स्वागत प्रास्ताविक आणि मान्यवरांचे सत्कार आयोजक बा.ना.धांडोरे यांनी पुष्पहार ,पुष्यगुछ आणि सावित्रीबाई फुले यांचे ग्रंथ भेट देऊन केले तर प्रथम सत्राचे अध्यक्ष पुढारीचे जेष्ठ पत्रकार मा. सिद्धार्थ ढवळे आणि दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आंबेडकर चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक पी.आर.भोसले यांना राजर्षि शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि आयोजक धांडोरे आणि पत्रकार राहुल खरात यांनी मोलाची मदत केली म्हणून त्यांचे देखील महात्मा फुले व सावित्रिमाई फुले यांची प्रतिमा , महात्मा फुले साहित्य साधने प्रकाशनसमिती , महाराष्ट्र शासनाचे सदस्य रघुनाथ ढोक यांनी भेट देऊन गौरव केला .त्यानंतर पहिले सत्रात थ्री वे मीडिया,मुंबई चे चन्द्रकांत सोनवणे- “पर्यायी प्रसार माध्यम आणि भारतीय लोकशाही” व डॉ.किसन इंगोले,मुंबई- “भारतातील सध्याची अर्थव्यवस्था” आणि मा. रंजन केदार ,मुंबई यांनी “सहकारी पतसंस्था व समाज उन्नति” या विषयावर मार्गदर्शन केले तर या सत्राचे अध्यक्ष दैनिक पुढारी ,पंढरपुर चे पत्रकार सिद्धार्ध ढवळे यांनी भूषविले तर दूसरे सत्रात “भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यावर डॉ. टी.एस. मोरे,बार्शी चे आंबेडकरी विचारवंत ,”सत्यसोधक विवाह चळवळीची गरज”-मा. रघुनाथ ढोक,प्रणेते,फुले शाहू आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते, “वंचिताचे शिक्षण”-मा.रतन माळी, पुणे शिक्षण तंज्ञ, “भारतीय संविधान आणि नागरिकाचे हक्क व कर्तव्ये” -डॉ. दीपक गायकवाड़,मुंबई, जेष्ठ विचारवंत यांनी बहुमोल असे विचार मांडून फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करून दिनदुबळयांना तसेच गरिबांना चागले शिक्षण ,रोजगार ,छोठे छोठे उद्योग देऊन त्यांच्या कुटुबाचा पर्यायाने देशाचा विकास करा. तसेच आपण भारतीय नागरिक म्हणून हक्क ,कर्तव्ये याचि माहिती घेऊन जनतेची सेवा करा असे सांगून जन प्रबोधन केले तर या सत्राचे अध्यक्ष म्हणून पी.आर.भोसले, आंबेडकरी विचारवंत यांनी भूषवून सर्व वकत्याने केलेल्या भाषणावर अध्यक्षीय म्हणून प्रतिपादन करताना 66% टक्के लोकांनी अजूनही भारतीय सविधान वाचले नाही. नुसते सविधान मधील कलम माहित करून न घेता त्यामागची भूमिका समजून घ्यावे कारण हा देश भारतीय संविधान वर चालत असल्याने सर्वांनी त्याचा आधर राखून मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून मावताधर्म पाळावा तर रघुनाथ ढोक म्हणाले की या विज्ञान युगात सर्व समाजाने विवाहावर अनाठायीं खर्च न करता काळाची गरज म्हणून सत्यसोधक पध्दतीने विवाह करून भटजीला न बोलवीता कोणत्याही स्री, पुरुषाकड़ून लग्न लावावेत असे म्हंटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुरेखा भालेराव तर मा. सुरेशचंद्र जगताप, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,मुंबई यांनी आभार मानले . यावेळी कार्यक्रमास एस के एवळे, सुनिल वाघमारे, प्रा. धैर्यशील भंडारे, अंकुश शेंबडे, श्रीकांत कसबे, सिध्दनाथ भंडारेसर , एल एस सोनकांबळे, गौतम सरतापे ,भालचंद्र कांबळे भास्कर बंगाळेसर, शहाजी गडहिरे, जगदिश मागाडे, नागटिळक साहेब ,पत्रकार राहुल खरात,उत्तम बालटे ,संपादक मुजावर व मोठ्या संख्याने सर्व समाज,कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button