Rawer

त्या महिला उपशिक्षिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणी : रावेर ते जळगांव पर्यंतच्या शिक्षण विभागाने घेतली धृतराष्ट्रची भुमिका!

त्या महिला उपशिक्षिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणी : रावेर ते जळगांव पर्यंतच्या शिक्षण विभागाने घेतली धृतराष्ट्रची भुमिका!

रावेर : “संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्चित झालेला आदर्श शिक्षक पुरस्कार सारखा प्रकरण जर गाजत असेल तर यास सरळसरळ कारणीभूत गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे पं. स. रावेर हे असून त्यांनी थेट अर्थ पुर्ण संबंधातून की काय मात्र आदर्श शिक्षक पुरस्कार बाबत जि.प. उर्दू मुलांची शाळा नं.१ रावेर येथील महिला उपशिक्षकचा प्रस्ताव सभापती यांना अंधारात ठेवून जिल्हा परिषद जळगांव येथे परस्पर पाठवल्याचा प्रकार दि.९ सप्टेंबर रोजी सदरील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत जागृत सदस्यांच्या माध्यमातून उघडकीस आला. मात्र यानंतर चौकशी व कारवाई गेली थंड बस्त्यात. म्हणून हा विषय नागरिकांमध्ये खूप चर्चेला जात आहे.”

दैनिक शब्दमत न्यूज नेटवर्क सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

जळगांव जिल्ह्यातील रावेर येथे जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा नं.१ मध्ये उपशिक्षक तथा मुस्लिम शरीया को-ऑपरेटिव्ह पतपेढी सावदा ची संचालिका असलेली महिला यांनी आधी सन २००५ पासून सरकारी नोकर भरतीसाठी लागू असलेल्या लाहन कुटुंबाची अतिरिक्त अट ची अधिकृत माहिती असतांना त्याचे उल्लंघन केले व नंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्ती साठी स्वतः ला ३ आपत्य असल्याची माहिती देखील लपवून शासना व शिक्षण विभागा यांना अंधारात ठेवण्याचा प्रकार केलेला दिसत आहे.

सबब या महिला उपशिक्षकचा नाव विभागीय आयुक्त नाशिक यांच्या आदर्श शिक्षक पुरस्कार यादीतून शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रथम वगळण्याची तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. व यानंतर सरकारी नोकर असताना सन २००५ पासून लागू लहान कुटुंबाची अतिरिक्त अट चे उल्लंघन करून ३ आपत्य असल्याची माहिती जाणीवपूर्वक रित्या निवड स्वतःच्या मानसन्मान करीता गैरवाजवी मार्गाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्तीसाठी शासनाची दिशाभूल केल्याबाबत ठोस कारवाई सदरील महिला उपशिक्षक विरुद्ध करणे फार गरजेचे आहे.तसेच बेजबाबदारीचा ठपका ठेवून सदर प्रकरणी गंभीर चूक करणारे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांच्यावर देखील जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई होणे तेवढेच गरजेचे आहे.

मात्र रावेर ते जळगांव पर्यंतच्या शिक्षण विभागाने सदर प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या असून ही १८ दिवसाचा कालावधी उलटल्या नंतरही कोणतीही चौकशी व कारवाई न करता जाणून बुजून धृतराष्ट्रची भूमिका बजवण्यात मगन आहे.

म्हणूनच सदरील महिला उपशिक्षक यांचे नाव आदर्श पुरस्कार यादीतून वगळण्यात यावे, व तीन अपत्य असल्याची माहिती लपवल्या बाबत त्याला सेवेतून अपात्र ठरवण्यात यावे,व तसेच गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे, सह प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई व्हावी या बाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड महाराष्ट्र राज्य मुंबई, विभागीय आयुक्त नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडे लवकरच सावदा येथील जागृत नागरिकाकडून लेखी तक्रार सादर केली जाईल याची खात्रीलायक माहिती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button