Amalner

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी  भारतीय विद्यार्थी मोर्चा मैदानात..पाडसे ते अमळनेर बस सेवा सुरू करा..!

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा मैदानात..पाडसे ते अमळनेर बस सेवा सुरू करा..!

अमळनेर आज १४ / १० / २०२१ रोजी सकाळी आगार प्रमुख अमळनेर बस स्टॅन्ड येथे पाडसे ते अमळनेर बस सेवा सुरू करण्यासंदर्भात भारतीय विद्यार्थी मोर्चा अमळनेर तर्फे निवेदन दिले.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यत दिं.०४/१०/२०२१ पासून शाळा नियमितपणे सुरू करण्याच्या आदेश पारित झाला असून , विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा उपलब्ध नसल्याने त्यांना वेळेवर शाळा व प्रॅक्टिकल ला उपस्थिती देता येत नव्हती .
तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी दिव्येश कैलाश पाटील ,समाधान चुणीलाल पाटील , भूषण शरद बोरसे यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चा अमळनेर चे अध्यक्ष .विशाल बैसाणे यांना सूचित केले असून संघटनेने आगार प्रमुख अमळनेर बस स्टॅंड यांना लवकरात लवकर शाळेच्या वेळापत्रक नुसार बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले .
निवेदन देण्यासाठी प्रमुख उपस्थिती विशाल बैसाणे (भारतीय विद्यार्थी मोर्चा ता.अध्यक्ष अमळनेर) ,मा.अजय अशोक गव्हाणे( भारत मुक्ती मोर्चा), मा.भुपेंद्र शिरसाठ (BVF) ,मा.अक्षय बाविस्कर (कार्यकारी अध्यक्ष BMP अमळनेर ) , मा.दिव्येश कैलास पाटील (विद्यार्थी पाडसे) , समाधान चुणीलाल पाटील(विद्यार्थी पाडसे), भूषण शरद बोरसे(विद्यार्थी पाडसे) , आकाश गुलाब कोळी (विद्यार्थी पाडसे ) , प्रेम शिवाजी पाटील (विद्यार्थी पाडसे ) , भावेश मनोज शिंदे (विद्यार्थी खरदे) , योगेश भामरे ( विद्यार्थी चौबारी ) , महेश सोनवणे (विद्यार्थी चौबारी ) , पवन राजपूत(विद्यार्थी चौबारी) ,हर्षल पाटील (विद्यार्थी चौबारी) ,रोशन राजेंद्र पाटील (विद्यार्थी पाडसे) इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button