Amalner

नगांव बु,खुर्द येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त मोफत सातबारा वितरण..!

नगांव बु,खुर्द येथे मा. उपविभागीय अधिकारी,अमळनेर भाग श्रीमती सीमा अहिरे मॅडम तसेच मा.तहसीलदार अमळनेर श्री मिलिंदकुमार वाघ सर यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निम्मीत मोफत सातबारा वितरण कार्यक्रम राबविण्यात आला

अमळनेर नगाव मंडळ भागातील नगांव बु,खुर्द येथे उपविभागीय अधिकारी,अमळनेर तसेच तहसीलदार अमळनेर श्री मिलिंदकुमार वाघ सर यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निम्मीत मोफत सातबारा वितरण कार्यक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रम मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ उपस्थित होते. तहसीलदार यांच्या हस्ते सातबारे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. पी एस पाटील मंडळ अधिकारी नगावं भाग, नगावं मंडळातील सर्व तलाठी श्री प्रथमेश पिंगळे श्री. स्वप्नील कुलकर्णी, श्री आशिष पारधे, श्री हर्षवर्धन मोरे, श्री महेश अहिरराव, श्रीमती राधिका गरुड तसेच कोतवाल श्री गोकुल बैसाने व राहुल पाटील यानी परिश्रम घेतले कार्यक्रमास श्री प्रवीण गोसावी पोलिस पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले आणि सदर कार्यक्रमास समस्त नगांव बु व नगांव खुर्द या गावातील सरपंच पंचायत समिति सदस्य पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button