India

पतंजली गुरुकुल मध्ये एका 24 वर्षीय साध्वीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या..!घटनास्थळी आढळली सुसाईड नोट..!एका व्यक्ती चे नाव घेत केला धक्कादायक आरोप..!

पतंजली गुरुकुल मध्ये एका 24 वर्षीय साध्वीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या..!घटनास्थळी आढळली सुसाईड नोट..!एका व्यक्ती चे नाव घेत केला धक्कादायक आरोप..!

हरिद्वार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.हरिद्वार येथे पतंजली योगपीठ संचालित गुरुकुल आहे. या गुरुकुल मध्ये राहणाऱ्या एका साध्वीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तसेच घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही आढळली आहे, ज्यात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

ही साध्वी गेल्या ६ वर्षांपासून गुरुकुलमध्ये राहत होत्या. साध्वीने आत्महत्या केल्यानंतर अनेक विषय समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार २४ वर्षीय साध्वी देवाग्या मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील हलोर येथील रहिवासी होती. २०१५ पासून योगपीठात वास्तव्यास होती. इथे एमए संस्कृत शिकत असून अध्यापन देखील करत करत होती. २०१८ मध्ये संन्यास दीक्षा घेतल्यानंतर संपूर्ण दिनचर्या साध्वी प्रमाणे व्यतीत करत होती.रविवारी सकाळी योगपीठ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. योगपीठाचे कर्मचारी जवळच्या भूमानंद रुग्णालयात घेऊन गेले पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात अनेक धार्मिक गोष्टींचा उल्लेख आहे.त्यात मी कोणतीही चूक केली नाही. मी स्वतःला संसारिक जीवनासाठी योग्य मानत नाही, म्हणूनच माझे जीवन संन्याश्यात संपवताना मला फक्त योगामध्ये मुक्ती घ्यायची आहे, असे या चिठ्ठीत लिहिले असल्याचे समोर आले आहे.
तिच्या पालकांना कळविण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.

साध्वी ने आत्महत्या का केली? सुसाईड नोट, पोस्ट मार्टम रिपोर्ट,व्हिसेरा रिपोर्ट यावरून अनेक गोष्टींचा खुलासा होणार आहे. दरम्यान पतंजली च्या कार्यपद्धती वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button