Parola

पारोळा तालुक्यात मागासवर्गीयां मधून प्रथम महिला एम. कॉम. होण्याच्या बहूमान मिळाला सिमा पानपाटील यांना..

पारोळा तालुक्यात मागासवर्गीयां मधून प्रथम महिला एम. कॉम. होण्याच्या बहूमान मिळाला सिमा पानपाटील यांना..

प्रतिनिधी – कमलेश चौधरी

पारोळा : वाणिज्य शाखा म्हटलं म्हणजे आपल्याला आठवतं मुंबई पुणे , त्यातल्या त्यात मोठं मोठ्या मातब्बर आणि व्यापारी लोकांची लेकरं. वाणिज्य शाखा ही गरिबांसाठी नाहीच अशी मागासवर्गीयांमध्ये समज असताना
पारोळा येथील सिमा पानपाटील यांनी एम. कॉम उत्तीर्ण होत पारोळा तालुक्यातून मागासवर्गीय महिलांमधून वाणिज्य शाखेच्या एम कॉम होण्याचा प्रथम महिला होण्याचा बहुमान मिळवला आहे. तालुक्यात अद्याप पर्यंत मागासवर्गीय महिलामंधून कुणीही एम कॉम झालं नव्हतं. कुठलेही कुणाचेही मार्गदर्शन नसतांना सीमा पानपाटील यांनी अभ्यासात अपार मेहनत घेत यश संपादन केले आहे. तरी त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.सीमा पान पाटील यांनी बी .कॉम किसान महाविदयलय येथे पूर्ण करत एम. कॉम हे मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे केले आहे.
सीमा पान पाटील ह्या पत्रकार जितेंद्र वानखेडे यांच्या बघीनी आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button