Pandharpur

पंढरपूर मध्ये अवताडे गटाची जोरदार मुसंडी गादेगाव, एकलासपूर या दोन ग्रामपंचायती वर अावताडे गटाचा झेंडा.

पंढरपूर मध्ये अवताडे गटाची जोरदार मुसंडी
गादेगाव, एकलासपूर या दोन ग्रामपंचायती वर अावताडे गटाचा झेंडा.

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : अनवली ग्रामपंचायत मध्ये अावताडे गटाचा उपसरपंच
पंढरपूर- पंढरपूर तालुक्यांमध्ये २०२०-२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत च्या निवडणुकी मध्ये आवताडे गटाने पंढरपूर विभागात जोरदार मुसंडी घेत असून प्रथमच या तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका लढवत असताना तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणारे गादेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी ज्योती विष्णू बाबर व उपसरपंच पदी योगेश दत्तात्रय बागल यांची निवड करून आपला झेंडा फडकवून वर्चस्व दाखवून दिले आहे. त्याच बरोबर एकलासपूर ग्रामपंचायतीवर अवताडे गटाचे सौ सोनाली सचिन पाटील सरपंच यांची निवड झाली आहे.
अनवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अवताडे गटाचे संजय भानुदास माळी यांची निवड झाली आहे. या सर्व विजेत्या सरपंच उपसरपंच यांच्या निवडीबद्दल माननीय समाधान दादा अवताडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पंढरपूर तालुक्यांमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील १८ गावांमधील निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये ३२ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे. यामध्ये काही गावांमध्ये पार्टी किंवा सदस्य निवडून जरी आले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढलेले असून याचा फायदा नक्कीच येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये होणार आहे. या निवडीमुळे पंढरपूर तालुक्यातील अवताडे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून कार्यकर्त्यांना एका प्रकारचे बळ आल्याचे दिसून येत आहे.
फोटो – समाधान आवताडे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button