sawada

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्तीसाठी त्या महीला उपशिक्षकानी ३ आपत्य असल्याची माहिती लपवली

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्तीसाठी त्या महीला उपशिक्षकानी ३ आपत्य असल्याची माहिती लपवली

ठळक मुद्दे

सन २००५ पासून सरकारी नोकर भरतीसाठी लाहन कुटुंबाची अतिरिक्त अट लागू

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव व महिला उपशिक्षकेला ३ मुले हा विषय पं.स.रावेर आढावा बैठकीत गाजला.

मात्र सदरील महिला उपशिक्षक व गट शिक्षणाधिकारी प.स.रावेर यांच्यावर कोणाच्या आशीर्वादामुळे कारवाई नाही

या संपूर्ण प्रकरणात रावेर ते जळगांव पर्यंतच्या शिक्षण विभागाने घेतली धृतराष्ट्रची भुमिका

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर येथे जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा नं.१ मध्ये उपशिक्षक असलेली महिला यांनी स्वतः ला ३ आपत्य असूनही जाणीवपूर्वक रित्या ही माहिती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करण्यासाठी लपवण्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

तसेच या महिला उपशिक्षकचा नाव आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्तावातून वगळण्यात यावे याबाबत गेल्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव सह इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेली तक्रार कडे थेट दुर्लक्ष करून पुढील कार्यवाही केली असून विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध यादीत सदरील महिला उपशिक्षक यांचे नाव समाविष्ट असल्याचे समोर आलेले आहे.

तसेच सदरील ३ आपत्य असलेल्या महिला उपशिक्षकचा प्रस्ताव पंचायत समिती रावेर सभागृहाला अंधारात ठेवून गट शिक्षणधिकारी शैलेश दखणे यांनी परस्पर जि.प.जळगांव येथे पाठवून दिलेला होता. म्हणून दि.९ सप्टेंबर २०२१ गुरुवार रोजी रावेर पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेली आढावा बैठकीत जागृत सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित करताच थेट गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी सभागृहात चक्क माफी मागितल्याची घटना सुद्धा घडलेली असून याप्रकरणी सभापती यांनासुद्धा गटशिक्षणाधिकारी यांनी अंधरात ठेवून सदरचा प्रस्ताव पाठविल्याची धक्कादायक बाब त्यावेळी समोर आल्याने हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरण जिल्ह्यात बहुचर्चित झाला. मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच ठोस कारवाई आज तागायत झाली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या पाठोपाठ सदर महिला उपशिक्षकेला ३ आपत्य असूनही त्यांनी ही बाब जाणीवपूर्वक रित्या फक्त आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्या कामी लपवलेली आहे. याबाबत जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी झाल्या आहेत.

सन २००५ पासून सरकारी नोकर भरतीसाठी लाहन कुटूंबाची अतिरिक्त अट लागू

तसेच सरकारी कर्मचारीला तीन आपत्य असतील तर तो नोकरी साठी अपात्र ठरवले जाते.कारण की सरळसेवेत भरती होणाऱ्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी लहान कुटुंबाची अतिरिक्त अट म्हणजे दोन पेक्षा अधिक मुले नसावीत असे सन २००५ पासून लागू करण्यात आली आहे.तसे प्रतिज्ञापत्र सुद्धा त्यांच्याकडून घेतले जाते.याचे उल्लंघन झाले तर तो त्या नोकरीसाठी अपात्र ठरतो.मात्र सदरील महिला उपशिक्षकेला ३ आपत्य असल्या बद्दल तक्रारी प्राप्त झाल्यावरही संबंधित अधिकार्‍याकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली दिसत नाही. शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षमुळेच सदरील महिला उपशिक्षक नियमानुसार कारवाईच्या बडग्यापासून सुरक्षित आहेत.किंवा सन २००५ पासून लागू अट ३ मुले असलेल्या सदरील महिला उपशिक्षकेला लागू नसावी की या लागू अट पासून शिक्षण विभागाचे अधिकारी अनभिज्ञ आहे.मात्र सर्वांची ही सोंगी भुमिका बरेच काही सांगून जाते हे मात्र खरे आहे.

सदरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव सभापती व इतर सदस्यांना अंधारात ठेवून परस्पर जिल्हा परिषद मध्ये पाठवण्याची गंभीर चूक करणारे गट शिक्षणधिकारी शैलेश दखणे पंचायत समिती रावेर यांच्यावरही कारवाई होत नसल्याने त्यांचा डिपारमेंटली फेवर होत असल्याची चर्चा सुद्धा आता नागरिकांमध्ये सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button