Yawal

निंभोरा येथे राष्ट्रवादीतर्फे समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन, शेतकरी,ज्येष्ठ नागरिक,युवकांचा चांगला प्रतिसाद.

निंभोरा येथे राष्ट्रवादीतर्फे समस्या जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन,
शेतकरी,ज्येष्ठ नागरिक,युवकांचा चांगला प्रतिसाद.

निंभोरा- ता रावेर संदिप कोळी
राष्ट्रवादि काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात सुरू असलेल्याबप्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी “एक तास राष्ट्रवादीसाठी” या कार्यक्रमानिमित्त आज निंभोरा ता रावेर येथे स्थानिक समस्यांच्या संदर्भात अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निंभोरा गणाचे पं स सदस्य दीपक पाटील होते.तर कार्यक्रमास राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष श्री सुनिल कोंडे,निंभोरा सरपंच सचिन महाले,माजी सरपंच तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी,तालुका सरचिटणीस वाय डी पाटील ,बाळासाहेब पवार, व्यासपीठावर मान्यवर हजर होते.
यावेळी बैठकीत माजीमंत्री एकनाथराव खडसे यांना पक्षातर्फे तातडीने विधानपरिषदेवर घेण्यासाठी हालचाली करण्याबाबत एकमुखी मागणी केली.
यावेळी प्रस्तावनेत तालुका सरचिटणीस वाय डी पाटील यांनी उपस्थितांसमोर ध्येय धोरणे व कार्यक्रमाचे प्रयोजन याबाबत माहिती दिली.ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमाची प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील,जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्रभैय्या पाटील यांच्या आदेशाप्रमाणे तळागाळातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,ज्येष्ठ नागरिक,युवक आदींच्या स्थानिक समस्या सोडविता याव्यात या अनुषंगाने कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

या वेळी कार्यक्रमात शेतकरी धनराज खाचणे,प्रा दिलीप सोनवणे,माजी सरपंच डिगंबर चौधरी रतन वाघ ,माजी ग्रा पं सदस्य मधुकर बिऱ्हाडे,बाळासाहेब पवार,महिला कार्यकर्त्या आशाबाई सोनवणे,हर्षल ठाकरे,ग्रा पं सदस्य मनोहर तायडे. ग्रा पं सदस्य दिलशाद शेख ,राज खाटीक,दस्तगिर खाटिक,राष्ट्रवादी शहराध्यक्ष अतुल पाटील,संदीप महाले यांनी सहभाग नोंदवत समस्या व अडचणी सांगितल्या.ज्येष्ठ नागरिक संघातर्फे भवन बांधून मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच सचिन महाले,पं स सदस्य दीपक पाटील राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी कार्यक्रमास श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल ब-हाटे,विशाल तायडे,दत्तात्रय पवार, संदीप खाचणे,धनराज बावस्कर, विजय बा-हे,लक्ष्मण ब-हाटे,चंद्रभान सूर्यवंशी,अरविंद भंगाळे,पितांबर भिरुड,एम टी बोंडे,लक्ष्मण बोरोले,आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्वांनी आपापल्या परिसरातील समस्या मांडल्याबाबत सुनील कोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button