Amalner

Amalner: मातोश्री मथुराबाई मोरे यांच्या स्मरणार्थ दिव्यांग मुलास ‌ तीन चाकी सायकल देऊन रघुनाथ मोरे यांनी जपला सामाजिक कार्याचा वारसा

मातोश्री मथुराबाई मोरे यांच्या स्मरणार्थ दिव्यांग मुलास ‌ तीन चाकी सायकल देऊन रघुनाथ मोरे यांनी जपला सामाजिक कार्याचा वारसा

अमळनेर :-

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अमळनेर नगरपालिका शाखेचे कार्याध्यक्ष रघुनाथ मोरे यांच्या दातृत्वाचा अनोखा परिचय नागरिकांना पुन्हा आला आहे. दिवंगत मातोश्री मथुराबाई रामभाऊ मोरे यांच्या स्मरणार्थ एका गरीब कुटुंबातील ताडेपुरा परिसरातील कमलेश विजय लोंढे या दिव्यांग मुलास स्व खर्चातून तीन चाकी सायकल भेट देऊन रघुनाथ मोरे यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून कमलेश विजय लोंढे या दिव्यांग मुलास अॅड. अशोक रामभाऊ मोरे यांच्या हस्ते तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले.
यावेळी रुपचंद पारे,विनोद जाधव,प्रवीण संदानशिव, पंकज साळी,राजेंद्र चौधरी,अर्जुन गढरे, मुस्ताक बागवान,गौतम सोनवणे,नवल बिऱ्हाडे, जुलाल बिऱ्हाडे, गौरव अहिरे, सुरेश वानखेडे,आधार पवार,भटू वाणी,योगराज अहिरे,नीलेश पाटील,दिलीप गोविंदा सोनवणे,गौतम मोरे,हिरालाल संदानशिव,रमेश सोनवणे, भाऊलाल बिऱ्हाडे, भरत सोनवणे, विकास मोरे,राजेंद्र संदानशिव,सुरेश आप्पा बिऱ्हाडे,अमोल सैंदाणे,दीपक बाविस्कर,विजय पारे, विनोद चौधरी,देविदास गजरे यांच्यासह अनेकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस चे अमळनेर नगरपालिका शाखेचे कार्याध्यक्ष असलेले रघुनाथ मोरे यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने ठोस भूमिका घेतली आहे. मात्र त्यांची ओळख निव्वळ कामगार नेता अशी न राहता “सामाजिक कार्यकर्ता” अशीच झाली आहे. कोविड -१९ च्या महामारी मुळे लॉक डाऊन लागल्याने अनेक कुटुंबांना आपला रोजगार गमवावा लागल्याने उपासमारीची वेळ आली होती. या गरजू कुटुंबांना पदरमोड करून अन्न धान्याचे किट वाटप करणारे रघुनाथ मोरे मुक्या प्राण्यांच्या चारापाणी साठी देखील विशेष काळजी घेत असतात. भटक्या कुत्र्यांना पाव बिस्किटे देणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. गाई – म्हशींना गवताच्या पेंढ्या देऊन आपल्यातील माणुसकीचा गारवा त्यांनी कोणतीही प्रसिध्दी न करता निष्ठेने जपला आहे.
काही दिवसापूर्वी त्यांच्या मातोश्री मथूराबाई रामभाऊ मोरे यांचे निधन झाले. सामाजिक कार्यासाठी मातोश्रींनी केलेले संस्कार कायम प्रेरणा देणाऱ्या ठरतात असे प्रांजळ भावना व्यक्त करणाऱ्या रघुनाथ मोरे यांनी गरीब कुटुंबातील दिव्यांग मुलांना तीन चाकी सायकल आईंच्या स्मरणार्थ देण्याचा संकल्प केला होता. या संकल्प पूर्तीची सुरुवात त्यांनी कमलेश विजय लोंढे या दिव्यांग मुलास सायकल देवून केली. आणखी इतर दिव्यांग मुलांना तीन चाकी सायकल देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button