Kolhapur

गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर; महाडिकांचा पराभव सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचा विजय.

गोकुळ दूध संघामध्ये सत्तांतर; महाडिकांचा पराभव सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचा विजय.
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा बलाढ्य आर्थिक गड असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी महादेवराव महाडिक व पी.एन.पाटील गटाचा पराभव झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने यश मिळविले आहे.
21 पैकी 17 जागा जिंकून गोकुळवर त्यांनी वर्चस्व मिळविले असून 33 वर्षे सत्ता हाती असलेल्या सत्ताधारांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. संपूर्ण राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु गोकुळची निवडणूक ही त्याला अपवाद ठरली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर ही निवडणुक झाली.
या निवडणुकीत सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे 17 उमेदवार विजयी झाले.
अरुणकुमार डोंगळे, अभिजित तायशेटे, विश्वास नारायण पाटील, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगुले, नविद मुश्रीफ, रणजित पाटील, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगुले, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, एस आर पाटील, बयाजी शेळके, सुजीत मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंजना रेडेकर
तर महादेवराव महाडिक व पी.एन.पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार विद्यमान संचालक अमरीश घाटगे व माजी अध्यक्ष अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके तसेच महिला गटातून महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा सौ. शौमिका महाडिक यांनी विद्यमान आमदार व गोकुळचे संचालक राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील यांचा पराभव केला. बाळासाहेब खाडे यांनी विजय मिळविला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button