Nashik

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत १५ जागासाठी ५४ उमेदवार रिंगाणात छाननीत १० उमेदवाराचे अर्ज बाद

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत १५ जागासाठी ५४ उमेदवार रिंगाणात
छाननीत १० उमेदवाराचे अर्ज बाद

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

नगरपंचायत निवडणुकीत अर्ज छाननीत 10 उमेदवारी अर्ज बाद झाले असून 15 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश श्रींगी ,सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी नागेश येवले यांचे दालनात छाननी प्रक्रिया झाली.
दरम्यान ओबिसिंसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र 11व 16 ची निवडणूक स्थगित झाली आहे. अर्ज छाननीत राजकीय पक्षांकडून दाखल परंतु त्यांना एबी फॉर्म नसल्याने ते बाद झाले .भाजपचा एक उमेदवाराचा एबी फॉर्म वेळेत जमा न केल्याने अर्ज बाद झाला मात्र अपक्ष अर्ज कायम आहे.पाच नगरसेवक यांचे अर्ज आहे.
मंगळवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी इच्छुकांची गर्दी होत 17 जागांसाठी 102 अर्ज दाखल झाले होते.ओबीसी दोन जागांना स्थगिती आली असून 15 जागांसाठी निवडणूक रंगणार आहे.
राष्ट्रवादी व भाजपा प्रत्येकी 13 जागा लढवत असून शिवसेना 11, काँग्रेस व मनसे प्रत्येकी दोन जागा लढवत आहे .दोन वॉर्ड मध्ये सरळ तर इतर बहुतांशी वॉर्ड मध्ये तिरंगी लढती रंगण्याचे चिन्ह आहे.अर्ज माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.प्रभाग क्र. 1 – रोहिणी भगवान गायकवाड (भाजप), मीराबाई नारायण पारखे (अपक्ष), रत्नाबाई सुभाष बोरस्ते (शिवसेना), निर्मला कैलास मवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस ), मेघा केशवराव शिंदे (अपक्ष), प्रभाग क्र. 2 – अविनाश बाबुराव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), रचना अविनाश जाधव (अपक्ष), सुहास अनिलराव देशमुख (शिवसेना), रचना विक्रमसिंह राजे (भाजप), निलेश भाऊसाहेब शिंदे (अपक्ष), प्रभाग क्र. 3 – कल्पना संतोेष गांगोडे (शिवसेना), जिजा शांताराम चारोस्कर (राष्ट्रवादी काँग्रेस), राणी रवि भोई (भाजप), प्रभाग क्र. 4 – सचिन बंडू पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), अक्षय वसंत बदादे (भाजप), सुनीता रमेश लहांगे (शिवसेना), प्रभाग क्र. 5 – फारुक मोहमद खान (भाजप), नरेश भास्करराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रितम प्रकाशराव देशमुख (अपक्ष), प्रदीप श्रीकांत देशमुख (शिवसेना), प्रभाग क्र. 6 – अरुणा रणजित देशमुख (भाजप), सुनीता आण्णासाहेब बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस), कमल दत्तू शिंदे (अपक्ष), प्रभाग क्र. 7 – प्रिया निलेश गायकवाड (अपक्ष), राजश्री सतीश देशमुख (शिवसेना), संगीता प्रमोद देशमुख (भाजप), श्रध्दा सुहास देशमुख (अपक्ष), लता रमेश बोरस्ते (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. 8 – शैला सुनील उफाडे (काँग्रेस), वैशाली विनोद चव्हाण (अपक्ष), प्रभाग क्र. 9 – निकीता प्रितम कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), मेघा नितीन धिंदळे (शिवसेना), जयश्री एकनाथ हिंडे (भाजप), प्रभाग क्र. 10 – जयेश शाम गवारे (काँग्रेस), नितीन मधुकर गांगुर्डे (भाजप), लता दशरथ निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), बाळू बाबुराव साठे (शिवसेना), प्रभाग क्र. 12 – आशा भास्कर कराटे (भाजप), राकेश गुलाब गांगोडे (अपक्ष), तुषार रामदास चारोस्कर (अपक्ष), धनराज सुनील भवर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. 13 – ज्योती सचिनराव देशमुख (शिवसेना), पुजा अविनाश देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस), शुभांगी अमोल मवाळ (मनसे), प्रभाग क्र. 14 – अक्षय अशोक चारोस्कर (अपक्ष), दिपक भास्कर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत भालचंद्र मोगल (शिवसेना), तुषार मधुकर वाघमारे (भाजप), प्रवीण सोेमनाथ सोनवणे (अपक्ष), प्रभाग क्र. 15 – सुनिता सुनील अस्वले (मनसे), प्रज्ञा तुषार वाघमारे (भाजप), नंदिनी अनिल साठे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. 17 – सुजित त्र्यंबक मुरकूटे (शिवसेना), दिनेश केशवराव शिंदे (अपक्ष)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button