Amalner

लालबाग शॉपिंग सेंटर बेकायदेशीर वाढीव बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणी..तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाडला बडतर्फ करा.. सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम

लालबाग शॉपिंग सेंटर बेकायदेशीर वाढीव बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणी..तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाडला बडतर्फ करा.. सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम

न.पा. सभेने मंजूर केलेली टी.पी. न. १२४ चे बेकायदा वाढीव बांधकाम ठराव केल्या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी आढळल्यास तत्कालीन मुख्याधिकारी सौ. विद्याजी गायकवाडला कार्यात कसूरी केल्या अंतर्गत शास्ती वा बडतर्फ करण्या संदर्भात….

वरील विषयाकारणे आपणास नागरीक हितास्तव विनंतीपूर्वक अर्ज करणे क्रमप्राप्त

समजतो ते येणेप्रमाणे

अमळनेर येथील लालबाग शॉपिंग सेंटर संदर्भात तत्कालीन मुख्याधिकारी सौ. विद्या गायकवाड (तत्कालीन मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरीषद ) यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ७७(ब) अन्वये टी.पी. नं. १२४ चा ( लालबाग शॉपिंग सेंटर) ८ फुटाचे वाढीव बांधकाम असा बेकायदेशीर ठराव सर्वसाधारण सभेत पारीत झाला असताना त्यांनी एक शासनाचा जबाबदार अधिकारी म्हणून कलम ३०८ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांच्याकडेस ३ दिवसाचे आत सादर करण्याचे जबाबदारी होती. परंतु त्यांनी तसे न करता बेकायदा बांधकामाच्या ठरावास समती दर्शवलेली प्रथमदर्शनी आढळ होत आहे. त्याकारणे टी.पी.नं. १२४ चे ८ फुट बेकायदा वाढीव बांधकाम प्रकरणाची पारदर्शी चौकशी करून अती दोषी आढळल्यास सौ. विद्या गायकवाड ( तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर ) यांना कार्यात कसुरी अंतर्गत शास्तीचे प्रयोजन होणे क्रमप्राप्त आहे.तरी नागरिक हितास्तव वरील बाबींचा आपण गांभीर्याने विचार करत पारदर्शी चौकशी करून या संदर्भात नागरिक हित जोपासले हित जोपासले जावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी पत्राद्वारे मा जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांना केली आहे तर या पत्राच्या प्रत मा. प्रधान सचिव (२) साहेब, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ३२.मा. मुख्याधिकारी, नगरपरिषद, अमळनेर यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button