Nanded

बिलोली तालुक्यात उज्वला योजनेचा उडाला फज्जा ग्रामिण भागात पुन्हा पेटल्या चुली!

बिलोली तालुक्यात उज्वला योजनेचा उडाला फज्जा ग्रामिण भागात पुन्हा पेटल्या चुली!

नागेश इबितवार बिलोली

नांदेड : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी पुन्हा चुली पेटल्याचे चित्र दिसत आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत.ग्रामिण भागात उज्वला योजनेत गॅस योजने अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आल्यावर चुलीचा वापर कमी झाला होता. परंतु सिलेंडरचे दर भडकताच आता एवढे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न मजूर वर्ग महिला समोर निर्माण झाल्याने आपली चूल’च बरी म्हणत चूल पेटायला लागल्या आहेगेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडर चे भाव गगनाला भीडत आहे. या वाढत्या गॅस दराची झळ सामान्य कुटुंबाला बसत आहे. मजुरांच्या घरातील घर खर्चाचे बजेट कोलमडत असून,काही भागात मिळत असलेल्या फुकट चे धान्य विकून घरातील तेल मीठ सारख्या गरजा भागवणे चालू झाले आहे. गेल्या काही दिवसामध् हाताला काम, मोलमजुरी नसल्याने घर चालवायचे कसे? अशी चिता लागली असतांना दुःख सांगावे कोणाला, असा नाराजीचा सुर महिला वर्गातून उमटत आहे.

संबंधित लेख

Back to top button