Aurangabad

कोणताही प्रसंग असो प्रसंगात शिवसैनिक मदतीला धावतोच : चंद्रकांत खैरे

कोणताही प्रसंग असो प्रसंगात शिवसैनिक मदतीला धावतोच : चंद्रकांत खैरे

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की कुठलाही प्रसंग असो या प्रसंगात सर्वप्रथम मदतीला शिवसैनिक धावतो, यामुळे शिवसेनेवर सर्वसामान्य नागरिकांचा आत्मविश्वास आहे. प्रत्येक सुखदुःखात आपल्या हक्काचा माणूस म्हणून नागरिक शिवसैनिकाकडे पाहतात. त्यामुळे नागरिकांच्या अडीअडचणी आपण प्राधान्याने सोडविल्या पाहिजे, असे आवाहन औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून व पालकमंत्री सुभाष देसाई तसेच आमदार मनीषा कायंदे यांच्या प्रयत्नातून सूतगिरणी, गारखेडा परिसरातील वॉर्ड क्र. ९७ रामकृष्णनगर, इंदिरानगर वॉर्डात बजरंगनगर, सूतगिरणी क्वाटर आदी ठिकाणी विविध विकाम कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, महिला आघाडीच्या संपर्कसंघटक कला ओझा, शहरप्रमुख विजय वाघचौरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, संजय बारवाल, विभागप्रमुख कान्हूलाल चक्रनारायण, देविदास पवार, लक्ष्मण गिरे आदींसह नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button