Mumbai

?महत्वाचे…10 वी साठी अंतर्गत मूल्यमापनातून विद्यार्थी होणार उत्तीर्ण अकरावीसाठी प्रवेश परीक्षा शालेय शिक्षण मंत्री  वर्षा गायकवाड

?महत्वाचे…10 वी साठी अंतर्गत मूल्यमापनातून विद्यार्थी होणार उत्तीर्ण
अकरावीसाठी प्रवेश परीक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक CET घेण्यात येईल. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थिती मुळे इ 10 वी च्या परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले आहे. परंतु या बाबतीत खूप गोंधळ असून 11 वी च्या प्रवेशाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या अनुषंगाने मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची काल बैठक संपन्न झाली.या बैठकीत झालेल्या चर्चे नंतर आज पत्रकार परिषदेत शिक्षण मंत्री यांनी अनेक महत्वपूर्ण गोष्टींचा उलगडा केला आहे.
सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.
त्यानुसार राज्य शासनाने इ. ९ वी व इ. १० वी साठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ. १० वी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष
• विद्यार्थ्यांचे इ १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
• विद्यार्थ्यांचे इ१०वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
• विद्यार्थ्यांचा इ. ९ वीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण ( इ. ९ वी संपादणूक यासाठी ५० % भारांश व इ. १० वी संपादणूक यासाठी ५० % भारांश)
ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
जून अखेर निकाल
मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन प्रा गायकवाड यांनी केले आहे.
अकरावी साठी प्रवेश परीक्षा
इ. १० वी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन होणार असल्याने इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेतली जाईल.ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकुण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button