Maharashtra

कर्तव्यदक्ष व रोखठोक लोकप्रतिनिधी असावा तर आमदार मंगेश चव्हाण यांच्या सारखा

कर्तव्यदक्ष व रोखठोक लोकप्रतिनिधी असावा तर आमदार मंगेश चव्हाण यांच्या सारखा…

प्रतिनिधी मनोज भोसले

चाळीसगाव शेहरात गेल्या चार पाच दिवसांपूर्वी चाळीसगाव येथे सापडलेल्या बनावट खतांच्या साठा बाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. त्यात त्यांनी बनावट खतांच्या विषयासोबत चाळीसगाव तालुक्यातील २ पोलीस कर्मचारी हे गांजा विक्रेत्याकडून लाच घेतली म्हणून बडतर्फ झाले होते याची माहिती दिली व परिस्थिती इतकी वाईट आहे की तुम्हाला शहरात १ किलो गांजा सहज कुठेही मिळून जाईल अस उपरोधिक पणे सांगत पोलीस यंत्रणेचे अपयश गृहमंत्र्यांना बोलून दाखवले होते. याचा परिणाम झाला असा की

शहर पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली असून घाटरोड वरील झोपडपट्टी परिसरात छापा घालून गांजासह जवळपास 15 लाखाची रोकड जप्त केली आहे गेली अनेक दिवस अपंग असल्याचं कारण दाखवत या ठिकाणी एकजण गांजा विक्री करीत असल्याची कुंणकुण पोलीस निरीक्षक विजकुमार ठाकुरवाड यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी

याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे ,पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांना

घाट रोड पाण्याच्या टाकी जवळील एका घरावर छापा घातला असतास गांजासह लाखोंची रोकड पॉलिसांनी जप्त गांजा नेमका किती किलो ते पोलिसांनी सांगितले नसले तरी रोकड मात्र 15 लाखाच्या जवळपास असल्याचं पोलीस निरीक्षक विजकुमार ठाकुरवाड यांनी सांगितलं आरोपी अपंग असून त्याच नाव सलिम अली अश्रफ अली (40) असल्याचं पोलिसांनी सांगितलं कारवाई यशस्वीतेसाठी मोहिमेत पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक,मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक विजय साठे, विनोद भोई, गणेश पाटील,संभाजी पाटील ,पंढरीनाथ पाटील,संदीप भोई, अभिमान पाटील यांनी काम पाहिलं.

हे हिमनगाचे टोक असून गांजा व इतर अनधिकृत व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल तालुक्यात होत असते आणि हे सर्व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने बिनबोभाट वर्षानुवर्षे सुरू आहे.

आता कुठे शेतकरी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी थेट एक्शन घेणारा आमदार तालुक्याला लाभला आहे, आगे आगे देखो होता है क्या…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button