India

Important: रेशन कार्ड अपडेट आता sms द्वारे..!असे जोडा मोबाईल ला..!पहा पद्धत..!

महत्त्वाचे:रेशन कार्ड अपडेट आता sms द्वारे..! ह्या पध्दतीने जोडा मोबाईल ला..!

ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ग्राहकांचे काम आता सोप्पे व त्वरित होणार आहे. रेशनकार्ड संदर्भातील महत्वाच्या अपडेट आता ग्राहकांना एसएमएसद्वारे मिळू शकणार आहेत. ग्राहकांच्या सेवेसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क अभावी रेशनकार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स एसएमएसद्वारे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांनी रेशनकार्डशी मोबाईल संलग्न करून तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशा सूचना दिलेल्या आहेत.

रेशनकार्ड मोबाईलशी असे जोडा –
1) सर्वप्रथम https://nfsa.gov.in/State/MH या संकेतस्थळाला भेट द्या.
2) तेथे ‘अपडेट युवर रजिस्टर मोबाईल नंबर’ असा पर्याय दिसेल. त्याखाली चार बॉक्स पाहायला मिळतील. पहिल्या बॉक्स मध्ये आधारकार्ड नंबर ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड/एनएफएस आयडी, कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक टाका.
3) पुढच्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर लिहा.
4) तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव नमूद करून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाका.
5) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button