Mumbai

टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोना संदर्भात महत्वाचे निर्णय..!मुख्यमंत्र्यांनी जारी केले आदेश..!हे आहेत नवीन नियम..!

टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोना संदर्भात महत्वाचे निर्णय..!मुख्यमंत्र्यांनी जारी केले आदेश..!हे आहेत नवीन नियम..!राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्य सरकारने करोना निर्बंधांबाबत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फॉर्सच्या बैठकीत हॉटेल, दुकानांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात कार्यपद्धती व नियम जाहीर करण्यात आले आहे.
करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने करोना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. अनेक नेत्यांनीही दुकाने आणि उपहारगृहांची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चाही झाली होती. सध्या दुकाने आणि उपहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा होती. आता ही वेळ आणखी वाढवण्यात राज्य सरकाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात आज राज्य सरकारकडून जीआर जारी करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आला आहे. यात राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसंच, दुकाने व उपहारगृहांच्या वेळेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला राज्य शासनासोबत चर्चेनंतर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button