Chandwad

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग महत्वाचे-प्रांताधिकारी देशमुख

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग महत्वाचे-प्रांताधिकारी देशमुख

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता हाय रिस्क पर्सन किंवा कॉन्टॅक्ट मधील नागरिकांनी RAT किंवा RTPCR टेस्ट करून घ्यावी असे आवाहन चांदवडचे प्रांताधिकारी श्री चंद्रशेखर देशमुख यांनी केले आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी 389 swab RAT टेस्ट करण्यात आल्या होत्या त्यापैकी 89 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तरी जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊन जास्तीत जास्त टेस्टिंग होणे महत्त्वाचे आहे असे आवाहन प्रांताधिकारी यांनी केले असून ज्या लोकांनी RTPCR/RAT टेस्ट केली आहे किंवा ज्या कुटुंबामध्ये पॉझिटिव्ह पेशंट आढळले आहेत अशा लोकांनी स्वतःहून गृह विलगीकरण करून घ्यावे.
सदरची बाब ही
1) त्यांनी स्वतःहून करावी नाहीतर ,
2)आपल्याला माहिती पडल्यास संबंधित गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक तलाठी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना तात्काळ निदर्शनास आणून द्यावे.परंतु अशा व्यक्तींचे विलगीकरण होणे खूप महत्त्वाचे आहे आणि आजच्या या कोरोना प्रसाराला हेच एक महत्त्वाचे कारण दिसत आहेत. असे प्रांताधिकारी यांनी सोशल मिडियाद्वारे कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button