India

Important: अबॉर्शन म्हणजेच गर्भपात नंतर किती दिवसांनी सेक्स सुरक्षित..!कायद्यासह जाणून घ्या इतरही माहिती…

Important: अबॉर्शन म्हणजेच गर्भपात नंतर किती दिवसांनी सेक्स सुरक्षित..!कायद्यासह जाणून घ्या इतरही माहिती…

अबॉर्शन म्हणजेच गर्भपात हा महिलेच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा बदल मानला जातो. ज्यामुळे महिलेच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. अबॉर्शननंतर अनेक महिलांना पोस्ट-अबॉर्शन केयर (Post-Abortion Care) याची गरज असते. मात्र अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न येतो की अबॉर्शननंतर किती काळाने लैंगिक संबंध ठेवला पाहिजे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, गर्भपातानंतर चुकीच्या वेळी लैंगिक संबंध ठेवणं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

गर्भपातानंतर सेक्स करण्याची योग्य वेळ जाणून घेण्यापूर्वी आपण अबॉर्शनसंदर्भातील कायदा काय म्हणतो हे पाहूया
भारतात गर्भपातासंदर्भातील मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी एक्ट, 1971 (The Medical Termination of Pregnancy Act, 1971) म्हणतो की, जर कोणत्या गर्भवती महिलेच्या जीवाला धोका असेल किंवा जन्माला येणाऱ्या जीवाला धोका असेल तर गर्भधारणेच्या 12 आठवड्यांपेक्षा कमीच्या काळात अबॉर्शन केलं जाऊ शकतं.

गर्भपातानंतर लैंगिक संबंध कधी ठेवावेत?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अबॉर्शननंतर लैंगिक संबंध ठेवणं हे महिलांची इच्छा आणि भावनांवर अवलंबून असतं. काही महिला गर्भपाताच्या काही महिन्यांमध्येच लैंगिक संबंध ठेवतात. तर काही महिलांना एका महिन्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो.
हेल्थलाईनच्या माहितीप्रमाणे, गर्भपातानंतर सेक्स करण्याची योग्य वेळ जवळपास 2 आठवड्यांच्या नंतर मानली जाते. तसंच वजायनल ब्लिंडींग बंद झाल्यानंतर संबंध ठेवावेत.

गर्भपातानंतर सेक्स कधी करावं हा प्रश्न बहुदा अनेक जणांच्या मनात असेल. आरोग्यविषयक कारणांमुळे जर तुम्हाला गर्भपाताचा सामना करावा लागला आणि त्यानंतर पुन्हा लगेचच तुमची गरोदर राहण्याची इच्छा नसेल तर यासाठी काय काळजी घ्यावी हे या लेखाच्या आधारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सेक्ससाठी किती काळ जाऊ द्यावा..

गर्भपातानंतर तुम्ही जेव्हा एकदम ठिक होता तेव्हा तुम्ही सेक्स करू शकता. तुम्हाला जर काही त्रास होत असेल, एक किंवा दोन आठवडे योनी मार्गे रक्तस्त्राव होत असेल तर पुन्हा सेक्स करण्यापूर्वी काही दिवसांसाठी तुम्ही थांबा. तुम्हाला कोणतीच समस्या नसेल तेव्हाच सेक्स करण्याचा निर्णय घ्या. याबाबत आपल्या जोडीदाराशी देखील संवाद साधा. तसेच गर्भपातानंतर सेक्सदरम्यान वेदना होत असतील तर ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गर्भपातानंतर तुम्ही लगेचच गरोदर देखील राहू शकता. पण जर लगेचच गरोदर राहण्याची इच्छा नसेल तर गर्भनिरोधकचा वापर तुम्ही करू शकता.

गर्भपातानंतर कोणत्या गर्भनिरोधकाचा वापर करावा?

– गर्भपातानंतर कोणत्या गर्भनिरोधकाचा वापर करणं योग्य आहे याबाबत ओळखीच्या डॉक्टरांना विचारा. तुम्ही कशाचा वापर केला पाहिजे हे तुमच्या वैद्यकिय समस्या अथवा गर्भपातादरम्यान निर्माण झालेल्या समस्या यावर अवलंबून असतं.

– उदाहरण म्हणजे जर तुमच्या गर्भामध्ये संसर्ग असेल तर तुम्ही IUD आणि IUS या उपकरणांचा वापर संसर्ग संपेपर्यंत करू शकत नाही. जर तुम्हाला कोणतीही वैद्यकीय समस्या नसेल तर तुम्ही कोणत्याही गर्भनिरोधकाचा वापर करू शकता.

गर्भपातानंतर आपत्कालीन गर्भनिरोधक वापरू शकतो का?

गर्भपाताच्या ५ दिवसांनंतर तुम्ही आपत्कालीन गर्भनिरोधकचा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही गर्भनिरोधकचा वापर न करता लैंगिक संबंध ठेवता किंवा गर्भनिरोधकाचा काही उपयोग झाला नाही असे तुम्हाला वाटत असेल तर लगेच ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भपात होऊन ५ दिवसही झाले नसतील तर गर्भनिरोधकचा वापर करण्याची गरज नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button