Amalner

अमळनेरला गौरी किंवा महालक्ष्मीचे उत्साहात विसर्जन

अमळनेरला गौरी किंवा महालक्ष्मीचे उत्साहात विसर्जन

अमळनेर : भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. भारतीय परंपरा, संस्कृतीत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी गौराईचे पूजन महालक्ष्मी स्वरुपात केले जात असल्यामुळे याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जाते. रविवार १२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ०९ वाजून ४९ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले यानंतर १४ सप्टेंबर रोजी आज विसर्जन करण्यात आले.
अमळनेर येथील श्रीमती सीमा धाडकर यांच्या घरी तीन ते चार पिढ्यांपासून गौरीपूजन केले जाते. यावेळी त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर सजावट केली होती. गौरी गणपतीच्या दर्शनासाठी अमळनेर शहरातील अनेक पुरुष व महिलांनी दर्शन घेतले यावेळी अमोल धाडकर, सुमित धाडकर विद्या धाडकर, लता धाडकर यांनी सजावटीसाठी अधिक मेहनत घेतली होती. गौरी गणपती बसल्यानंतर त्यांनी पूजा विधी स्नेहभोजन अभिषेक करत तेथील सजावट भाविकांचा आवडीचा विषय ठरला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button