Amalner

कंजरभाट समाजाची स्मशान भूमि तत्काल विकसित करा..कंजरभाट समाजाची मुख्याधिकारी यांना निवेदन..

कंजरभाट समाजाची स्मशान भूमि तत्काल विकसित करा..कंजरभाट समाजाची मुख्याधिकारी यांना निवेदन..

अमळनेर मौजे ताडेपुरा अमलनेर येथील कंजरभाट समाजाची स्मशान भूमि अस्तित्वात आहे. सदर स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट असून पावसाळ्याच्या काळात व अनेक वर्षा पासून या कडे अमळनेर नगरपरिषदेने लक्ष दिलेले नाही.स्मशानभूमीची अवस्था दयनीय असून येथे लाईट देखील नाहीत.जाण्या येण्या साठी रस्ता नाही बसण्यासाठी ओटा नाही अश्या अनेक समस्या असून मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुण तत्काळ व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रीय भाँतु सांसी समाज विकास संस्था व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मागणी
1 रास्ता करणे
2 बसन्या साठी शेड बांधणे
3 अंत विधि साठी ओटा बांधणे
4 लाइट लावणे,वॉल कंपाउंड करणे इ मागण्या करण्यात आल्या आहेत.
वरील कामा करीता त्वरित लक्ष केंद्रित करुण काम करुण देण्यात यावे ही सम्पूर्ण कंजरभाट समाज बांधवानी केली आहे.

आज निवेदन देताना या संदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी यांनी सदर कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी राजेश माछरे
सूरज कंजरभाट,राहुल कंजर,रमेश तिलंगे, अशोक माछरे, शशि बागड़े, विकी अभंगे कृष्णा अभंगे, विशाल कंजर, सरजू अभंगे इ समाज बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button