Nashik

दिंडोरी तालुक्यातील माऊली शेतकरी बचत गट खडक सुकेणे यांच्यावतीने नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट व सत्कार व आभार

दिंडोरी तालुक्यातील माऊली शेतकरी बचत गट खडक सुकेणे यांच्यावतीने नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट व सत्कार व आभार

सुनिल घुमरे दिंडोरी

जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने येथील माऊली शेतकरी बचत गटाच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र
नाशिक परिक्षेत्राचे विशेषपोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेतली व त्यावेळी दिंडोरी तालुक्यातील माऊली शेतकरी बचत गट खडक सुकेणे त्यांच्या वतीने गेल्या पंधरा दिवसापूर्वी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे काढण्यासाठी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर गेल्या 20 ते 22 दिवसांमध्ये खडक सुकेने तालुका दिंडोरी येथील शेतकऱ्यांचे अडकलेले जवळपास 20 ते 22 लाख रुपये मिळाले असून उर्वरित चार ते पाच शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे त्याचप्रमाणे शेतकरी वर्गाला माऊली शेतकरी बचत गट यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रताप दिगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने पैसे मिळाले म्हणून आज खडक सुकेने येथील माऊली शेतकरी बचत गट व पैसे मिळालेले शेतकरी यांनी सकाळी 11 वाजता भेट घेऊन साहेबांचे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन आभार मानले यावेळी दिघावकर म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःहून यासाठी पुढे येऊन व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे त्याचा फोन नंबर पत्ता याबाबत सर्व माहिती संबंधित पोलीस स्टेशन यांना लेखी अर्ज करावा व येणाऱ्या काळात लवकरच मी या विभागातील शेतकरी वर्गाचे व्यापाऱ्यांकडे असलेले पैसे मिळावेत यासाठी पत्रकार परिषद आयोजित करणार असून त्या ठिकाणी सर्व पत्रकारांना बोलावून याबाबत जनतेला पूर्ण माहिती देणार आहे तसेच काही शेतकरी आपल्याकडे शेती करताना भांडवल उपलब्ध नसते म्हणून खाजगी सावकार किंवा या पद्धतीचे व्यवसाय करणारे यांच्याकडे जमिनी गहाण ठेवतात व आपली निकड भागवतात मात्र उत्पन्न मिळाले की शेतकरी पैसे परत करतो परंतु त्याला त्याचा दस्तऐवज किंवा त्यांनी घेतलेले मूळ पैसे न घेता ज्यादा पैसे आकारून दस्तऐवज देण्यास टाळाटाळ करतात अशा नागरिकांनी याबाबत संबंधित पोलीस स्टेशन किंवा मला माहिती द्यावी हाही विषय आपण मोडीत काढणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

यावेळी खडक सुकेने येथील माऊली बचत गटाचे शेतकरी बापू तात्या पालखेडे, पंढरीनाथ ढोकरे, सुरेश फुगट, पुरुषोत्तम गणोरे, विठ्ठल जाधव, बापू गनोरे, दीपक गणोरे, अमोल गणोरे, चक्रधर गणोरे, नारायण पालखेडे, हरिभाऊ कळमकर, नारायण गणोरे, गुलाब गणोरे, नारायण पालखेडे, मधुकर फुगट, भाऊसाहेब पालखेडे, सर्व शेतकरी उपस्थित होते याकामी शर्मिष्ठा वालावलकर एडिशनल एसपी नाशिक सदाशिव वाघमारे डीवायएसपी कळवण दिंडोरी पोलीस स्टेशन अनिल कुमार बोरसे पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दिंडोरी प्रवीण पाडवी पोलीस उपनिरीक्षक दिंडोरी वणी यांचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button