Latur

?सास्तुर येथील बलात्काराच्या आरोपींना तात्काळ फाशी द्या अक्षय धावारे भिम आर्मी प्रदेश संघटक

सास्तुर येथील बलात्काराच्या आरोपींना तात्काळ फाशी द्या
अक्षय धावारे भिम आर्मी प्रदेश संघटक

लातुर प्रतिनिधी:- लक्ष्मण कांबळे

लातूर – सध्या संपूर्ण देशामध्ये दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार महिलांवर होणारे बलात्काराच्या घटना पाहता काही दिवसांपूर्वी हाथरच प्रकरणामुळे संपूर्ण देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता तो प्रकरण थांबले नाही तोपर्यंत महाराष्ट्रात सास्तुर जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी एका दहा वर्षिय मुलीवर सामूहिक बलात्काराच प्रकरण समोर आले महापुरूषांची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात असे प्रकार घडण म्हणजे माणूस्कीला काळीमा फासणारी घटना आहे चार दिवस उलटून ही आरोपींवर गुन्हा होत नाही म्हणजे आरोपीला पाठिशी घालणारे पोलीस प्रशासन तर नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.लातुर च्या भिम आर्मीचे जिल्हा प्रमुख विलास चक्रे जिल्हा सचिव बबलू शिंदे शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे रेणापूर तालुका संघटक कार्तिक गायकवाड रोहित अदमाने मराठा लिब्रेशन टायगर संघटनेचे भीमराव गाडेकर दत्ता पवार तसेच मराठवाडा संघटक विनोद कोल्हे आदी कार्यकर्त्यांनी पिडीत कुंटूबीयांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर पिडीत कुंटूबावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे सास्तूर येथील सरपंच व येथिल पोलीस कर्मचारी कुंटूबावर दबाव आणत असल्याचे समजले आहे आम्ही लोकशाहीला माणणारे लोक आहोत आरोपींवर गुन्हा दाखल करुन तात्काळ कडक शासन करावे व आरोपींना पाठिशी घालणार्या सास्तुर येथील सारपंचावर देखिल गून्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे भिम आर्मीचे प्रदेश संघटक अक्षय धावारे म्हणाले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button