Faijpur

बलात्कार प्रकरणांतील सर्व आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्या-दिपाली चौधरी झोपे

बलात्कार प्रकरणांतील सर्व आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्या-दिपाली चौधरी झोपे

सलीम पिंजारी फैजपूर

फैजपूर : साकीनाका (मुंबई) येथे झालेल्या पाशवी बलात्कार प्रकरणातील पिडीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेतील सर्व आरोपिंना तत्काळ अटक करुन सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपिंना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा व प्रदेश भाजपा ओबीसी महिला सहसंपर्कप्रमुख दिपाली चौधरी झोपे यांच्या नेतृत्वात फैजपूर पोलीस स्टेशन येथे पीएसआय मोहन लोखंडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनाची प्रत मा.मुख्यमंत्री , गृहमंत्री यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक, विभागीय पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आली आहे.यावेळी दिपाली चौधरी झोपे यांनी सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महिला व मुलींवर अत्याचार, बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असुन दिवसाढवळ्या मुली,महिलांना उचलून नेत अत्याचार करण्यापर्यंत नराधमांची मजल गेली आहे.त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नसुन महिला अत्याचार विरोधी कायदा अजुन कडक करून आरोपींना त्वरित फाशी देण्यात आली पाहिजे तरच अशा घटना बंद होतील.असं देखील त्या म्हणाल्या.
यावेळी खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा व भाजपा ओबीसी महिला मोर्चा प्रदेश सहसंपर्कप्रमुख सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्यासह हिंगोणा येथील सामाजिक कार्यकर्त्या कु.जागृती जी भोळे, फैजपूर येथील श्रीमती शशिकला चौधरी,सौ.शकुंतला किसन झोपे,सौ.रजनी चौधरी,सौ.नलिनी नारखेडे,सौ.रुपाली चौधरी, सौ.आशाबाई पाटील, कु.मनिषा गुळवे इत्यादी खान्देश नारीशक्ती गृप सदस्या उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button