Aurangabad

कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना योजनांचा लाभ तात्काळ द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण…

कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना योजनांचा लाभ तात्काळ द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे आई वडिलांपैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या न्याय्य हक्काबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ तत्काळ मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा कृती दलाची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

एक पालक गमावलेल्या 326 आणि दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांना शासनाच्या नियमानुसार असणाऱ्या सर्व योजनांचा, 265 विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना चव्हाण यांनी केल्या. दोन्ही पालक गमावलेल्या 13 बालकांपैकी तीन बालकांना बालगृहात प्रवेशित करण्यात येणार आहे. तर 10 बालकांना बाल कल्याण समितीसमोर उपस्थित करून दरमहा अकराशे रूपये प्रतिमाह योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लाभ देण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करावी, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button