Faijpur

फैजपूर येथील हॉटेल तूर भावी मधून देशी विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक जोरात लॉक डाउन काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली कारवाईची मागणी

फैजपूर येथील हॉटेल तूर भावी मधून देशी विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक जोरात लॉक डाउन काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली कारवाईची मागणी

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील हॉटेल तूर भावी परमिट रूम बीअर बार मधून देशी विदेशी दारूची सर्रास अवैध वाहतूक केली जात असून कोरूनाचा कडक लॉक डाउन काळात जिल्हाधिकारी यांचे आदेश वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे येथील गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना च्या भयंकर आजाराने थैमान घातले असून कोरोना संसर्ग रोगाला आळा बसावा म्हणून सर्वत्र कडक लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंधासह कडक लॉक डाऊन जाहीर केले आहे परंतु त्याचा वेगळाच अनुभव येथील पाहायला मिळत आहे फैजपुरातील मधुकर सहकारी साखर कारखाना परिसरातील हॉटेल तूर भावी परमिट रूम बीअर बार वर सकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत बिनधास्तपणे सर्रास देशी विदेशी दारूचे खोके चे खोके वेगवेगळ्या वाहनांद्वारे तसेच फोर व्हीलर टू व्हीलर द्वारे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून याला दारूबंदी विभागाच्या खुला आशीर्वाद आहे काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून कडक लॉक डाऊन सुरु असतांना त्या दिवसापासून हॉटेल तूर भावी परमिट रूम बीअर बार मधून दररोज लाखो रुपयांची देशी विदेशी दारू ची अवैधरीत्या वाहतूक होत असून जिल्ह्यासह फैजपुरात सर्वत्र लॉक डाऊन नियम पाळले जात असून पोलिस प्रशासन नगरपरिषद ग्रामपंचायत हे विभाग कोरोना ला आळा बसावा म्हणून प्रशासन जिवाचे रान करीत आहे परंतु या हॉटेल तूर भावी परमिट रूम बीअर बारला कोणाचेही बंधन नाही काय असा प्रश्न उपस्थित झाला असून या बिअर बारमधून होणारी सर्रास विक्रीला लॉक डाऊनचे नियम लागत नाही का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला असून दारूबंदी विभागाचा खुला आशीर्वाद आहे का असा प्रश्न उपस्थित झाला असून संबंधितांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button